पारंपारिक रित्या कारागिरी करून व्यवसाय करणाऱ्या अठरा प्रकारच्या बलुतेदारांना विनातरण कर्ज दिले जाणार आहे. केवळ पाच टक्के व्याज दराने हे कर्ज दिले जाणारा आहे. पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजने अंतर्गत हे कर्ज देण्यात येणार असून. पारंपारिक व्यवसायांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना आखली आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सामान्य सुविधा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र किंवा सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग विभागाच्या संकेतस्थळावर लाभ घेणाऱ्यांना नोंदणी करणे आवश्यक आहे.
ही योजना मिळवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, जातीचे प्रमाणपत्र,छायाचित्र, जन्मतारखेचा पुरावा, बँकेचे पासबुक, बँक खात्याशी आधार मोबाईल नंबर रजिस्टर इत्यादी कागदपत्रे असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत धोबी,गवंडी, मूर्तिकार, चर्मकार, टोपल्या- झाडू बनवणारे कारागीर, होडी बोट बांधणारे कारागीर, विविध अवजारे बनवणारे कारागीर, चाव्या-कुलूप बनवणारे कारागीर, लोहार,कुंभार, नाव्ही,माळी,सुतार,दागिने बनवणारे कारागीर, अशा विविध 18 पारंपारिक पद्धतीच्या बोलुतेदार कारागिरांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.