कापूस 10,579 सोयाबीनला 7,077 रुपये MSP शिफारस

Update: 2025-02-12 17:50 GMT

Cotton Soybean MSP :


कापसाला 10579 तर सोयाबीनला 7077 रुपये हमीभावाची शिफारस खरीप हंगाम 2025-26 वर्षासाठी महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगान केली आहॆ. धान, तीळ, उडीद,तूर भुईमूग पिकांना वाढीव हमीभाव देण्याची शिफारस केली आहॆ.

कापसाला 10579 तर सोयाबीनसाठी 7077 रुपये हमीभावाची शिफारस कृषि मूल्य आयोग कारण्यात आली आहॆ. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर कापूस आणि सोयाबीन हमीभावाची वाढ होणार अशी शक्यता होती मात्र ती काही पूर्ण झाली नाही आता मात्र कृषी मूल्य आयोगाने कापसाला आणि सोयाबीनला भरीव वाढ करण्याची शिफारस दिल्ली येथे झालेल्या बैठकीत सदस्यांनी केली आहे

कापसाला 10589 रुपयांची शिफारस -

राज्यातील मुख्य नगदी पीक असलेल्या कापसाकरिता यंदाच्या हंगामात प्रति क्विंटल 10589 रुपयांची शिफारस करण्याच सुचवलं आहॆ. मागील हंगामात लांब धाग्याच्या कापूसाच्या वाणाला 7521 रुपये इतका हमीभाव होता. यंदा त्यात 3058 रुपये इतक्या वाढीची शिफारस राज्य कृषिमूल्य आयोगाकडून करण्यात आली आहे.

सोयाबीनसाठी क्विंटलला 7077 भाव -

महाराष्ट्र राज्य कृषिमूल्य आयोगाकडून या वेळी सोयाबीन पिकाला क्विंटल मागे 7077 रुपयांच्या हमीभावाची शिफारस केली आहे. मागील हंगामात 4892 रुपयांचा हमीभाव सोयाबीनला होता. यंदाच्या हंगामात 2185 रुपयांच्या वाढीची शिफारस राज्याकडून करण्यात आली आहे, मध्य प्रदेशातील सोयाबीन उत्पादकांनी सोयाबीनला दहा हजार रुपयांचा हमीभाव मिळावा याकरिता मोठी आंदोलन केली सोयाबीनचे भाव वाढावे यासाठी सरकारवर दबाव आहॆ. कदाचित याची दखल घेत सरकारला यंदा सोयाबीन हमीभावाबाबत यामध्ये मार्ग काढन्याशिवाय पर्याय नाही.

हमीभावाचे आता चार झोन -

हमीभावाकरिता देशभरात चार झोन निश्चित करण्यात आले आहेत. यातील पश्चिम झोन असलेल्या गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान व अन्य अशा चार राज्यांच्या कृषिमूल्य आयोगाच्या शिफारशी साठी बैठक दिल्लीत पार पडली. या बैठकीला राष्ट्रीय कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्षांबरोबर महाराष्ट्र राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, शेतकरी प्रतिनिधी रवींद्र मेटकर यांच्यासह इतर राज्यातील प्रतिनिधींची उपस्थिती होती.

कृषि मूल्य आयोगाची MSP शिफारस दर चौकटीत गेल्या हंगामातील दर आहेत.

धान : 4783 (2300)

ज्वार : 4788 (3371)

तूर : 8315 (7550 )

उडीद : 11753 (7400)

भुईमूग : 11817 (6783)कापूस 10579 सोयाबीनला 7077 रुपये MSP शिफारस

तीळ : 11422 (9267)

Tags:    

Similar News