Budget 2025 : शेतकऱ्यांना काय मिळालं?

Update: 2025-02-01 12:23 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाचा आज महत्वपूर्ण 2025 चा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सादर केला. या अर्थसंकल्पाकडे सर्वसामान्य नागरिक,उद्योजक महिला वर्ग, तसंच शेतकरी वर्गाच विशेष लक्ष लागून होत. यात विशेषकरून मध्यमवर्गासाठी आयकर मध्ये सुट देण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. यात 12 लाख उत्पन्न पर्यंत कोणताही कर लागणार नसल्याचं म्हटलं आहॆ तर शेती आणि शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

शेती-उत्पन्नवाढीसाठी मोठ्या घोषणा -

1) 7 कोटी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देणार, कार्ड मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढवणार.

2 ) कृषी क्षेत्र आत्मनिर्भरतेकडे नेण्यास भर, डाळी, डाळिंब उत्पादनात आत्मनिर्भरता आणणार.

3) कापूस उत्पादकता वाढवण्यास आणि मार्केटिंगवर भर, 5 वर्षांचा आराखडा आखणार.

5) पंतप्रधान धन धान्य कृषी योजना सुरू कणार, 1.7 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार

6) मच्छिमारांसाठी स्पेशल इकॉनॉमिक झोन.

7) डेअरी आणि मस्त्यपालनासाठी 5 लाखांपर्यंत कर्ज देणार

8) मखाना उत्पादकता वाढवण्यासाठी विशेष बोर्ड स्थापन केले जाणार

9) आसाम मध्ये युरिया प्रकल्प उभारणार

10) तरुण शेतकऱ्यांना शेती प्रक्रिया उद्योजक बनवण्यासाठी विशेष योजना

या बजेट मध्ये काय राहून गेले -

* सद्या सर्वच क्षेत्रात AI तंत्रज्ञानान व्यापल आहॆ त्यात कृषी क्षेत्र ही अपवाद राहू नये यासाठी या अर्थसंकल्पात AI तंत्रज्ञानासाठी विशेष तरदूत अपेक्षित हाती मात्र AI साठी कोणतीही तरतूद केलेली नाही.

* शेतकऱ्यांना मजूर टंचाईचा मोठा सामना करावा लागतो यासाठी शेती कामासाठी आधुनिक यंत्र महत्वाचे आहेत या यंत्र निर्मिती आणि वापर साठी अर्थसंकल्पात अनुदानाची कोणतीही तरतूद केलेली नाही

* शेती परवडत नाही अशी ओरड कायम शेतकऱ्यांची असते कारण बी-बियाणे, रासायनिक फवाणारे आणि खत प्रचंड महाग आहेत यावरील GST जास्त असल्याने त्याचा भुर्दंड शेतकऱ्यांना बसतो.

माफदा या संस्थेने GST कमी करावी अशी मागणी केली होती ती पूर्ण झाली नाही

* फळ आणि भाजीपाला नाशवंत असल्याने देशभर शीतग्रह जाळ उभारण आवश्यक आहॆ मात्र शीतग्रह साठी तरतूद केलेली नाही.#बजेट2025 शेतकऱ्यांना काय मिळालं

Full View

Tags:    

Similar News