बारामती, परळीत पशु वैद्यकीय महाविद्यालय होणार

Update: 2025-02-25 14:37 GMT

बारामती आणि परळी येथ पशु वैद्यकीय महाविद्यालय होणार असल्याचा महत्वापूर्ण निर्णय आज झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठकित घेण्यात आला. यावेळी एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपस्थित होते. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 7 महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

गेल्या महिन्यात बारामती येथ कृषि प्रदर्शन भरवण्यात आलं होत त्यावेळी अर्थमंत्री अजित पवार तसच पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भागात पशुवैद्यकीय महाविद्यालय द्यावं अशी मागणी केली होती. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोघा नेत्यांची मागणी पूर्ण करण्यात आली.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीचे निर्णय -

1) पौड, ता. मुळशी, जिल्हा पुणे येथे लिंक कोर्टऐवजी दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या न्यायालयाची स्थापना करण्यास मान्यता.

(विधी व न्याय विभाग)

2) ठाणे जनता सहकारी बँकेत सार्वजनिक उपक्रम, महामंडळे यांना खाते उघडण्यासाठी परवानगी

(वित्त विभाग)

3) 1976 पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पाने बाधित पुनर्वसित गावठाणांमध्ये नागरी सुविधा पुरवण्यासाठी प्रलंबित कामांचा कृती कार्यक्रम राबविण्याचा निर्णय; अशा 332 गावठाणासाठी 599.75 कोटी रुपये मंजूर

(मदत व पुनर्वसन विभाग

4 ) महाराष्ट्र राज्य आधारसामग्री (डेटा) धोरणास मान्यता; राज्य डेटा प्राधिकरण स्थापन करणार. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नियामक समिती.

(नियोजन विभाग)

5) बारामती जिल्हा पुणे येथे नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी. यासाठी 564.58 कोटी रुपये मंजूर

(कृषि व पदुम विभाग)

6) परळी, जिल्हा बीड येथे नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी. यासाठी 564.58 कोटी रुपये मंजूर

(कृषि व पदुम विभाग)

7) महाराष्ट्र महामार्ग अधिनियम कलम 18 (3) 1955 मध्ये सुधारणा, तसेच महाराष्ट्र महामार्ग अध्यादेश 2025 ला मान्यता

(सार्वजनिक बांधकाम विभाग)

Tags:    

Similar News