प्रचंड वाढत शहरीकरण, शेतीत प्लाट पडत आहॆ मग शेती करायची कुठे असा प्रश्न पडत आहॆ यासाठी विना माती शेती असे प्रयोग काही ठिकाणी होत आहॆ त्यातीलच बारामतीच्या कृषी प्रदर्शनात माती विना शेती हा प्रयोग केला आहॆ. या प्रकल्पामध्ये एकूण आठ प्रकारे माती विना शेती करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या जमीनीमध्ये ही माती विना शेती करु शकतो. खडकाळ भागात हा प्रकल्प फायदेशीर ठरेल. हा प्रकल्पामुळे 50 ते 60 टक्के पाण्याची बचत होत असून पिकांना जास्त औषध फवारणी करावी लागत नाही.