कृषि विभागाकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना रबवल्या जातात, मात्र काही योजनात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होतो. काही योजनाचा खरंच आवश्यक आहेत का? याबाबत गंभीर्यकने कृषि मंत्रालय विचार करतं आहॆ. याची समीक्षा केली जाणार असल्याची माहिती कृषि मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बारामतीत दिली. शेतकऱ्यांना पिकावर फवारणी यंत्र सबसिडीवर दिलं जातं मात्र फवारणी यंत्र आवश्यक आहॆ का? त्याऐवजी ड्रोन चा वापर करता येईल का याबाबतही विचार विनिमय सुरु आहेत.