मत्सपालन बरोबर जैव सुरक्षेवरही लक्ष गरजेच - जॉर्ज कुरियन

Update: 2025-02-14 16:46 GMT

"जलचर प्राण्यांचे आजार उदयोन्मुख आव्हाने आणि सज्जता ” या विषयावरील दोन दिवसीय परिसंवादाचे केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.

या प्रसंगी बोलताना जॉर्ज कुरियन यांनी परिसंवाद आयोजित करण्याच्या भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) पुढाकाराचे कौतुक केले आणि "एक पृथ्वी - एक कुटुंब" दृष्टिकोनावर भर दिला. मत्स्यपालनात पोषण आणि जैवसुरक्षेचे अत्यन्त महत्त्व असल्याच सांगितलं. देशात अन्न सुरक्षा, उपजीविका आणि आर्थिक वाढ सुनिश्चित करण्यासाठी शाश्वत मत्स्यपालन पद्धती महत्वाच् असल्याचे कुरियन यांनी अधोरेखित केले. प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजने (PMMSY) सारख्या विविध सरकारी उपक्रमांतर्गत केलेल्या प्रयत्नांचे कौतुक त्यांनी केले आणि जलचर प्राण्यांच्या आरोग्य व्यवस्थापनात सतत संशोधन आणि नवोन्मेषाची गरज यावर भर दिला. रोग देखरेख यंत्रणा मजबूत करण्यासाठी, जैवसुरक्षा प्रोटोकॉल वाढविण्यासाठी आणि निदान व उपचारात्मक उपायांमध्ये सुधारणा करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्यासाठी सरकारी संस्था, संशोधन संस्था आणि संबंधितांचा समावेश असलेल्या बहु-भागधारक दृष्टिकोनासाठी कुरियन यांनी आवाहन केले.

उदयोन्मुख आव्हाने आणि सज्जता' या विषयावर, नवी दिल्लीतील पुसा कॅम्पस येथील आयसीएआर कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित परिसंवादाचे उद्घाटन, केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी केले. या परिसंवादाचे आयोजन हा 14 व्या आशियाई मत्स्यव्यवसाय आणि जलचर मंच ( 14 एएफएएफ) बैठकीचा एक भाग आहे. 12 ते 15 फेब्रुवारी 2025 दरम्यान आयोजित या बैठकीची संकल्पना "ग्रीनिंग द ब्ल्यू ग्रोथ इन एशिया-पॅसिफिक" अशी आहे. ग्रीनिंग द ब्ल्यू हा संयुक्त राष्ट्र प्रणाली अधिक पर्यावरणीय शाश्वत होण्यास साहाय्य करण्यासाठीचा संयुक्त राष्ट्रांचा पुढाकार आहे.

आयसीएआरचे उपमहासंचालक (मत्स्यव्यवसाय विज्ञान) आणि परिसंवादाचे संयोजक डॉ. जे.के. जेना यांनी परिसंवादाविषयी संक्षिप्त विवरण केले. भारत सरकार तसेच आशिया प्रशांत क्षेत्रातील नेटवर्क ऑफ अ‍ॅक्वाकल्चर सेंटर्सनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी आभार मानले. मजबूत जैवसुरक्षा उपाययोजनांच्या गरजेवर त्यांनी भर दिला आणि मत्स्यपालनात चांगल्या रोग नियंत्रणासाठी धोरणे विकसित करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या एनएसपीएएडी(जलचर प्राण्यांच्या आजारावर राष्ट्रीय देखरेख कार्यक्रम ) टप्पा II आणि आयएनएफएआर प्रकल्पावर चर्चा केली. मत्स्यपालनात रोग संशोधन आणि नियंत्रण वाढवण्यासाठी त्यांनी मत्स्य आरोग्यावरील नेटवर्क प्रकल्प हा एक महत्त्वाचा उपक्रम म्हणून अधोरेखित केला. हा उपक्रम, मत्स्यपालनात संभाव्य धोके कमी करण्यासाठी रोग व्यवस्थापन आणि लवकर प्रतिसाद यंत्रणेवर लक्ष केंद्रित करतो. नवीन प्रजाती, नवीन प्रणाली आणि मत्स्यपालनाच्या विस्तारासह मत्स्यपालनाच्या विविधतेच्या दृष्टीने भविष्यासाठी रोग व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे असेल, यावर त्यांनी भर दिला. मत्स्यपालनात प्रभावी रोग व्यवस्थापनासाठी निदान, रोगनिवारणशास्त्र आणि लसींचे महत्त्व देखील डॉ. जेना यांनी अधोरेखित केले.

आशियाई मत्स्यव्यवसाय आणि जलचर मंच हा एशियन फिशरीज सोसायटीचा त्रैवार्षिक कार्यक्रम आहे. या संस्थेचे मुख्यालय मलेशियातील क्वालालंपूर येथे आहे. 14 व्या एएफएएफचे आयोजन एशियन फिशरीज सोसायटी, नवी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन परिषद, केंद्र सरकारचा मत्स्यव्यवसाय विभाग आणि एशियन फिशरीज सोसायटीची मंगळुरु येथील भारतीय शाखा यांनी संयुक्तपणे केले आहे. वर्ष 2007 मध्ये कोची येथे झालेल्या 8 व्या एएफएएफ नंतर हा प्रतिष्ठित कार्यक्रम दुसऱ्यांदा भारतात आयोजित केला जात आहे.

Tags:    

Similar News