पिवळ्या सोन्याची व्यथा: डॉ.सोमिनाथ घोळवे

नावाने आणि अर्थाने पिवळं सोनं म्हणून ओळखलं जाणारं सोयाबीन (Soyaben) यंदा करपलं आहे गेल्या आठ वर्षातील भावांची आकडेमोड करत अभ्यासक डॉ. सोमिनाथ घोळवे यांनी मांडलेला सोयाबीनचा ताळेबंद...;

Update: 2023-10-23 05:43 GMT

शेतकरी घाम गाळून पिवळे सोनंं (सोयाबीन) पिकवतो. परंतु त्याची झोळी काय पडते? याचा विचार करणे बंद करण्यात आले आहे. सातत्याने पिवळ्या सोन्याच्या भावात बेभारोसा तयार करून ठेवला आहे. (पहा. खालील दिलेली आकडेवारी). परिणामी पिवळ्या सोन्याचे उत्पादन घेवूनही चांगला भाव मिळत नसल्याने शेतीकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टीकोन शेतकऱ्यांमध्ये येऊ लागल आहे. भविष्यात जर असेच चालू राहिले तर याची फार मोठी किंमत व्यवस्थेला मोजावी लागणार आहे.

गेल्या 5 ते 6 वर्षांपासून एकदम गुंतवणूक आणि उत्पन्नातील फरक वाढत चालला आहे. त्यामुळे पुन्हा शेतीक्षेत्र हे मोठ्या प्रमाणावर आर्थिक असुरक्षिता असणारे बनले आहे. उदा. गेल्या पाच वर्षात शेती निर्विष्ठांचे भाव जवळजवळ 90 ते 140 टक्क्यांने वाढलेले आहेत. त्यामुळे शेतीतील गुंतवणूक जवळजवळ दुप्पट ते अडीच पट वाढली आहे. उदा. 2014 -15 मध्ये एक एकर शेतीमधील कुटुंबाची मजुरी वगळता गुंतवणूक खर्च 8 ते 9 हजार होता. तोच चालू वर्षी (2023-24) 18 ते 19 हजारावर आला आहे. उलट 2014 साली उत्पादन हे एकरी 7 ते 8 क्विंटल होते. तेच 2023-24 मध्ये 3 ते 5 क्विंटलवर आले आहे. जवळजवळ उत्पादनात 30 ते 40 टक्के घसरण झाली आहे.

एकीकडे दुष्काळी स्थिती असल्याने उत्पादनात घसरण झाली असे समजले. तरीही गेल्या वर्षी पाऊस चांगला होऊनही एकरी 5 क्विंटल चे सरासरी सोयाबीन उतारा मिळाला होता. दुसरीकडे यांत्रिकीकरण आणि रासायनिक खतांच्या वापर वाढल्याने जमिनीतील सुपीकता कमी झाली असल्याने उत्पादन प्रत्येक वर्षी घटत चालले आहे. अर्थात शेतीतील गुंतवणूक वाढत असताना दुसरीकडे उत्पादन घसरण चालू आहे. परिणामी बहुतांश शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची घसरण देखील झालेली आहे. देशातील महागाईचा दर प्रत्येक वर्षी 6 ते 7 टक्के आहे. त्या तुलनेत शेतकरी कुटुंबाची उत्पन्नातील दर प्रत्येक वर्षी 6 ते 7 वाढ होण्याऐवजी घसरण चालू आहे.

एकंदर 2013 -14 मध्ये शेतकरी कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न जेवढे होते, तेवढेच उत्पन्न आता नाही असे अनेक शेतकरी सांगताना दिसून येतात. फक्त रुपयांचे मूल्य कमी झाल्याने रुपयांचे आर्थिक मूल्यांची आकडेवाढ झाली. कागदोपत्री उत्पन्नाचे आकडे वाढवल्याने शेतकरी कुटुंबातील प्रगती झाली का? तर मुळीच नाही. कारण बहुतांश शेतकरी कुटुंबाची आर्थिक बचत थांबलेली आहे. 8-10 वर्षांपूर्वी जोव्यवसाय किंवा इतर मार्गाने कष्ट करून बचत होण्याचे चालू होते. मात्र अलीकडे बचतीच्या ऐवजी बँक,खाजगी सावकार, गाव सोसायटी, मायक्रो फायनान्स संस्था यांचे कर्ज बाजारी होण्याचे प्रमाण वाढले आहे.

शेतमालाच्या भावाला कायदेशीर संरक्षण नसणे, शेती निर्विष्ठांचे भाव वाढ, गुंतवणूकीच्या तुलनेत परतावा कमी मिळणे अशी विविध करणे या घसरणीस होण्यामागे आहेत. शेतमालाचे उदाहरण घेऊन पाहूया. उदा. सोयाबीन चे गेल्या 8 वर्षातील दर काय होते.

◆ 2014-15 - 3104/- रुपये प्रती क्विंटल.

◆2014-15-3104/-

◆2015-16 - 3713/-

◆ 2016-17 - 2646/-

◆2017-18 - 3050/-

◆2018-19 - 3192/-

◆2019-20- 3658/-

◆2020-21 -3869/-

◆2021-22 -6550/-

◆2022-23 - 6607/-

◆2023-24 -4535/-

गेल्या आठ वर्षे सोयाबीनचे दर वरील प्रमाणे राहिले असल्याने शेतकऱ्यांचे शेती करण्याचे आणि जगण्याचे प्रश्न निर्माण करणारे कृषी क्षेत्र निर्माण होवू लागले आहे.

सोमिनाथ घोळवे.

२२ ऑक्टोंबर २०२३


Tags:    

Similar News