उत्तर – मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये आज तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे तर काही ठिकाणी ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील 16 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. नैऋत्य मान्सून पूर्व विदर्भ वगळता राज्यात तसेच गुजरातच्या दक्षिण भागात पोहोचला असल्याचे भारतीय हवामान विभागाने (IMD) जाहीर केले.
या 16 जिल्ह्यांना यलो अलर्ट -
विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नगर, पुणे, सोलापूर धाराशिव, लातूर या 16 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या 16 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहनही हवामान विभागाने मार्फत करण्यात आले आहे.
उत्तर – महाराष्ट्र स्थिती
उत्तर – मध्य महराष्ट्रात नगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात धाराशिव, लातूर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून बीड नांदेड जिल्ह्यांमध्ये हलक्या व मध्यम सरींची शक्यता आहे.
14 जूननंतर पाऊसात खंड -
उत्तर व मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पावसाने उघडीप दिली असली तरी काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण आहे. नाशिक, सोलापूर, नगर भागात पावसाचा जोर कमी अधिक आहे. नाशिक, जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. राज्याच्या अनेक भागात मागच्या काही दिवसात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. मात्र, 14 जूनपासून राज्यात पावसाचा 10 दिवसांचा खंड पडण्याची शक्यता हवामान विभागाणे IMD ने वर्तवली आहे.