करारनामा झाल्याशिवाय कामगार गाडीत बसणार नाही - प्रकाश आंबेडकर
Workers will not get in the car without an agreement - Prakash Ambedkar;
करारनामा झाल्याशिवाय एकही कामगार गाडीत बसणार नाही, याची काळजी घ्या असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. ऊसतोड कामगारांच्या विविध मागण्यांसाठी, वंचित बहुजन आघाडी आता मैदानात उतरली आहे. रविवारी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये, भगवान गडाच्या पायथ्याशी ऊसतोड कामगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
यावेळी ऊसतोड कामगारांना संबोधित करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले , की कारखाना सुरू करणं ही कारखानदारांची गरज आहे. आज जशी तग धरलेली आहे, सगळ्या ऊसतोड मजूर यांनी असचं घट्ट बसून राहावं. नव्या करारनाम्यासाठी माथाडी कामगारां सारखा लढा तुम्ही लढा..माथाडी कामगारांसारखा ऊसतोड कामगार बोर्ड तयार झाला पाहिजे, अ़शी भूमिका त्यांनी मांडली. या लढ्याला यशस्वी करण्यासाठी जे योगदान देता येईल ते द्या.त्यामुळं करारनामा झाल्याशिवाय एकही कामगार गाडीत बसणार नाही याची काळजी घ्या.असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले.