Monsoon2023 पाऊस पडणार की नाही?

जून महिना संपत आली तरी पाऊस गायब आहे. राज्यात वातावरणात सातत्याने बदल होताना दिसून येत आहेत. अद्यापही मान्सूनने (Monsoon Update) दडी मारली आहे. पण आजपासून मान्सून पुन्हा सक्रीय होईल असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे

Update: 2023-06-23 03:02 GMT

Maharashtra Mansoon Update :देशाच्या अर्थकारणाला समाजकारणाला प्रभावित करणाऱ्या मान्सूनने महिनाभर दडी मारली असून आता मान्सून ने देशात सर्वदूर प्रगती केल्याचं भारतीय हवामान विभागाने (IMD) स्पष्ट केलं आहे.महाराष्ट्रात आजपासून दिनांक २३, २४, २५, २६ जून (शुक्रवार ते सोमवार ) तुरळक ठिकाणी किरकोळ ते मध्यम पाऊस पडणार आहे.




 


                   कोकणात पावसाचा जोर अधिक म्हणून मुंबईसह संपूर्ण कोकणातील ४ जिल्हे व गोव्यात तसेच विदर्भातही मात्र उद्यापासूनच म्हणजे गुरुवार दि.२२ जून व त्यापुढील पाच दिवस म्हणजे सोमवार दि.२६ जून पर्यन्त जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता जाणवते, असे ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.

जून महिना संपत आली तरी पाऊस गायब आहे. राज्यात वातावरणात सातत्याने बदल होताना दिसून येत आहेत. अद्यापही मान्सूनने (Monsoon Update) दडी मारली आहे. पण आजपासून मान्सून पुन्हा सक्रीय होईल असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, मुंबई आणि नवी मुंबई परिसरात काल (Navi Mumbai Rain) दहा मिनिटे पाऊस झाला. आतापासून पुढील दोन दिवस पावसासाठी अनुकल वातावरण आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Rain Alert)

मान्सून पुढे जाण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. तो पुढे सरकण्यासाठी कमी दाबाचे पट्टे तयार होण्याची प्रक्रिया सुरु झाली असून, आज आणि उद्या कोकण, विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मान्सूनचे वारे पुढे जाण्यासाठी कमी दाबाचे पट्टे तयार होणे गरजेचे असते. ते आता तयार होऊ लागले असून वार्‍याचा वेगही वाढला आहे. अरबी समुद्रासह लक्षद्वीप, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे तयार झाले. त्यामुळे वार्‍याचा वेग ताशी 40 ते 50 किमी इतका झाला आहे. मान्सून सध्या रायचूर या भागात आहे. त्याने दक्षिण भारतासह ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, पूर्व उत्तर प्रदेश या भागात प्रगती केली.

मुंबई तापली, सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद

दरम्यान, मान्सून गायब असल्याने मुंबईचा पारा चांगलाच वाढला आहे. मुंबईत सरासरीपेक्षा अधिक तापमान नोंदविण्यात आले आहे. जूनमध्येही मेसारखा उकाडा जूनचा शेवटचा आठवडा सुरू झाला तरी अद्याप मे महिन्यासारखा उष्मा कायम आहे. गुरुवारी ही जाणीव अधिक तीव्र झाली. भारतीय हवामान विभागाकडून सातत्याने मान्सूनला चालना मिळाल्याचे सांगण्यात येत असताना मुंबईत पावसाचा शिडकावाही होत नाही.मुंबईत गुरुवारी कुलाबा येथे 34.4 तर सांताक्रूझ येथे 34.5 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान दोन्ही केंद्रांवर सरासरीपेक्षा तीन अंशांनी अधिक आहे. गुरुवारचे तापमान 35 अंशांच्या पार नसूनही उकाड्याची जाणीव अधिक होती. दिवसभरात पश्चिमेकडून वारे वाहत होते. संध्याकाळच्या सुमारास आर्द्रता मात्र कमी होती. कुलाबा येथे 63 तर सांताक्रूझ येथे 59 टक्के आर्द्रतेची नोंद झाली. त्यामुळे आर्द्रतेमुळे उकाड्यात वाढ झाली नसल्याचे समोर आले.

आज शुक्रवार दि.२३ जूनपासून हळूहळू ही लाट सदृश स्थिती लोप पावेल.ह्या परिणामामुळे तसेच बं. उ. सागरातील आंध्र-ओरिसा कि. पट्टीवरील ३ किमी. उंचीवरील चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे मान्सूनची बंगाल शाखा पूर्व कि. पट्टीकडे वाटचाल करू शकते.मान्सूनच्या बंगालच्या शाखेमुळे अरबी समुद्रात थंडावलेली मान्सूनची शाखाही उर्जीतावस्थेत येईल, असे वाटते. परंतु सुरवातीला तीचा जोर कोकणातच अधिक तर सह्याद्रीच्या पूर्वेकडील वर्षाच्छायेच्या प्रदेशात(विशेषतः नगर, पुणे सातारा ह्या जिल्ह्यात) सध्या तरी काहीसा कमी जाणवेल,असे वाटते. शुक्रवार दि.२३ जूनपासुन महाराष्ट्रात काही ठिकाणी 'पूर्वमोसमी' तर काही ठिकाणी 'मोसमी' पावसाच्या असलेल्या शक्यतेनुसार उद्या गुरुवार दि.२२ जून पासुन हळूहळू पावसासाठी वातावरणात बदल होण्याची शक्यता जाणवते.

महाराष्ट्रात दि.२३, २४, २५, २६ जून (शुक्रवार ते सोमवार ) तुरळक ठिकाणी किरकोळ ते मध्यम पाऊस होणार आहे.

                   कोकणात पावसाचा जोर अधिक म्हणून मुंबईसह संपूर्ण कोकणातील ४ जिल्हे व गोव्यात तसेच विदर्भातही मात्र उद्यापासूनच म्हणजे गुरुवार दि.२२ जून व त्यापुढील पाच दिवस म्हणजे सोमवार दि.२६ जून पर्यन्त जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता जाणवते.मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मात्र शुक्रवार दि.२४ जूनपासुन पावसाची शक्यता असल्याचे माणिकराव खुळे यांनी सांगितले.

Tags:    

Similar News