मग महाराष्ट्रात कशाला द्राक्ष शेती करायची..?
द्राक्षसंकटामुळं आमची गावं कर्नाटकात स्थलांतरीत करा नायतर आमची शेती विकून कर्नाटकात स्थलांतरीत होऊ असा उद्विग्न इशारा प्रगतीशील द्राक्ष उत्पादक शेतकरी मारुती नाना चव्हाण यांनी MaxKisan शी बोलताना दिला आहे..;
कधीकाळी वैभवशाली ठरलेली महाराष्ट्राची द्राक्ष शेती गेल्या चार-पाच वर्षात गतप्राण झाली आहे. संकटकाळात शासनाकडून एका पैशाची किंवा धोरणाचीही मदत झाली नाही.. या संकटात शेजारच्या कर्नाटक आणि तेलंगणा राज्यातील शेतीधोरणं कमालीची शेतकरी हिताची ठरली आहे. कर्नाटकातील द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटातही उभारी घेत आहे.. ते शासनबळावर.. आम्ही मागून मागून थकलो.. मायबाप सरकार ऐकायला तयार नाही.. शक्य झालं तर आता आमची गावं कर्नाटकात स्थलांतरीत करा नायतर आमची शेती विकून कर्नाटकात स्थलांतरीत होऊ असा उद्विग्न इशारा प्रगतीशील द्राक्ष उत्पादक शेतकरी मारुती नाना चव्हाण यांनी MaxKisan शी बोलताना दिला आहे..