कांदा ज्यावेळी मातीमोल दराने रस्त्यावर फेकला जात होता.. विकला जात होता..MaxKisan ने ९ मे २०२३ रोजी बाजार भाव विश्लेषक दीपक चव्हाण यांची मुलाखत घेतली होती. आज कांद्याची जी परिस्थिती आहे त्यापेक्षा भयानक परिस्थिती सप्टेंबर ऑक्टोबर आणि त्यानंतरच्या काळात असणार आहे. कांद्याचा तुटवडा कशामुळे निर्माण झाला? उपायोजना असूनही सरकार ठिम्म का बसले? उभ्या आभाळाखाली शेतीचा बिझनेस करणारा शेतकरी टोमॅटो पाठोपाठ कांदा भाव वाढ होऊ नये सरकारी धोरणाने कसा प्रतारीत होतो? शेतकऱ्यांनी आता शहाणं व्हावं खराब होऊ शकणारा कांदा तत्काळ विकून टाकावा ऑक्टोबर नोव्हेंबर टिकेल असाच कांदा साठवणुकीत ठेवावा असं विश्लेषण अभ्यासक दीपक चव्हाण यांनी MaxKisan शी बोलताना व्यक्त केला होता या अभ्यासपूर्ण विश्लेषण मॅक्स किसान पुन्हा एकदा प्रसिद्ध करत आहे.