Monsoon काय आहे राज्यातील पाऊस पाण्याचा अंदाज? विजय जायभावे
मान्सूनचं आगमन झाल्याच्या बातम्या सर्वत्र आहेत.. पण तुमच्या जिल्ह्यात मान्सूनचा आगमन कधी होणार? काय आहे वातावरणीय परिस्थिती? पेरण्या कधी करायच्या? वाचा आणि समजून घ्या तुमच्या भागातील पावसाचा अंदाज..विजय जायभावे यांच्याकडून..;
राज्यात मान्सून सक्रिय झाला असून अरबी समुद्रावर पुढील 24 तासात ऑप्शल ट्रफ किनार पट्टीला तीव्र होईल आणि कोकण घाट माथ्यावर पाऊस वाढेल बंगाल च्या उपसागरावरील कमीदाबा पट्टा पश्चिम उत्तरे कडे सरकत असून विदर्भ उत्तर भागात 27/28 पासून पाऊस वाढेल पुढे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या भागात 29/30 पर्यंत काही भागात पाऊस वाढेल कोकण घाट परिसरात नाशिक पुणे सातारा कोल्हापूर घाट भागात जोरदार पाऊस होईल पूर्वे कडे मध्यम पाऊस राहील
27/28/29/ राज्यात मान्सून सक्रिय राहील या काळात विजाचा पाऊस कमी होऊन मान्सून चा पाऊस सरू होईल. या काळात विदर्भ उत्तर महाराष्ट्र संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्रचा घाटाचा भाग आणि लगत जोर अधिक राहील अशी शक्यता आहे.
जुलै मध्ये कमी दाब उपसागरावर निर्माण होत राहून पावसाठी पोषक वातावरण निर्माण होईल ऑगस्ट एल निनो तीव्र होणार असला तरी हिंदी महासागरावर IOD देखिल जुलै पासून पॉजिटीव्ह होणार असल्यामुळे या काळात पावसाचा जोर वाढणार आहे.
⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️
उत्तर महाराष्ट्र 26 जून
जळगाव धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजी नगर अहमदनगर काही भागात मध्यम पाऊस होईल.जळगाव, संभाजी नगर अहमदनगर, नाशिक भागात पाऊस 27/28/29/30 जळगाव धुळे संपूर्ण उत्तर महाराष्ट्र पावसाचा जोर वाढेल.
नाशिक अहमदनगर धुळे नंदुरबार घाट माथायावर तीव्र 60mm ते 70 mm पाऊस होईल.पूर्वे कडील भागात 40mm ते 50mm पाऊस होईल तर काही भागात मध्यम पाऊस होईल.
⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️
कोकणपट्टीत कसा पाऊस पडणार?
कोकण सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी ठाणे मुंबई पालघर 27/28/29 /30जून पासून पुढे मुसळधार ते काही भागात 70mm 80 mm हुन अधिक पाऊस अतिमुसळधार पाऊस 2/3 जुलै पर्यंत पाऊस सुरु राहील.
⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️
मध्य महाराष्ट्रातला पाऊस पाणी:
मध्य महाराष्ट्र पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर सांगली पुढील दोन दिवस पाऊस पडेल तसेच 28/29/30 जून या भागात जोरदार पाऊस होईल 1/2/3/4 जुलै पाऊस काही भागात पडेल.
⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️
मराठवाड्यात काय आहे पाऊस पाण्याची परिस्थिती:
मराठवाडा 26 जून पुढील दोन दिवस लातूर, नांदेड हिंगोली परभणी बीड धाराशीव ढगाळ वातावरण राहून मान्सून चा पाऊस 26 जून काही भागात जोरदार वळिव पाऊस होईल 28/29 जून पर्यंत पावस राहील1/2 जुलै देखिल पाऊस वाढलेला राहील
⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️
विदर्भात किती पाऊस?
विदर्भ 26 जून
पूर्व विदर्भ ,नागपूर, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली,अमरावती, अकोला , बुलढाणा, वाशीम अनेक ठिकाणी मान्सून सक्रिय झाला. 26/ 27/28 ते 30 पूर्व विदर्भ मुसळधार 60 mm ते 70 mm पाऊस काही भागात होईल. 30 जून पर्यंत पावसाचा जोर वाढलेला राहील जुलै मध्ये संपूर्ण विदर्भात पावसात वाढ होण्याची शक्यता आहे.