social media
शेतकर्यांमध्ये आक्रोश असताना महाराष्ट्रात महा विकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा करून या कायद्याची राज्यात अंमलबजावणी करावी की नाही याबद्दल मत जाणून घेतली. याच बैठकीत शेतकऱ्यांची फसवणूक व लूटमार यापासून संरक्षण व्हावे यासाठी राज्यात कृषी न्यायालये स्थापन करावीत अशी आग्रही मागणी किसान सभेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
मात्र, ही कृषी न्यायालय नक्की काय आहेत? या कृषी न्यायालयाची रचना कशी असणार? कृषी न्यायालय स्थापन करुन शेतकऱ्यांना न्याय मिळणार का? कामगार कायद्याप्रमाणे देशातील शेतकऱ्यांसाठी कायदे करणे शक्य आहे का? नवीन कृषी कायदा कोणाच्या फायद्याचा..? नवीन कायदा शेतकऱ्यांसाठी की व्यापाऱ्यांसाठी?
पाहा शेतकरी नेते अजित नवले यांचं विश्लेषण