राज्यातील सत्तासंघर्ष अजूनही संपलेला नाही. महत्वाचा खरीप हंगाम अतिवृष्टीनं हातातून गेला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी कृषी विद्यापीठांच्या संशोधनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. भाजपचे प्रवक्ते कृषी विद्यापीठातील विद्यार्थी शेती का करत नाही असं म्हणतायतं..
आजच्या अन्यधान्याच्या स्वयंपूर्णतेत कृषी विद्यापीठाचं योगदान काय? कृषी विद्यापीठांचं नेमकं दुखणं काय? विद्यापीठांनी कोणी दुर्लक्षित केलं? कृषी विद्यापीठांच्या स्थापनेचा उद्देश फेल झालाय काय? MaxMaharashra वर झालेल्या चर्चेच्या संपादित अंशामधे पहा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. राजाराम देशमुख आणि भाजप प्रवक्ते गणेश हाकेंमधील जुगलबंदी...