बळीराजाची ताकद काय असते? ते आम्ही सरकारला दाखवून देऊ:रविकांत तुपकर
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची पत्रकार परिषद;
कापूस, तूर, सोयाबीन, संत्री या पिकांना भाव मिळण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर 1 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर पर्यंत विदर्भातून यलगार यात्रा काढणार आहेत.20 नोव्हेंबर ला शेतकऱ्यांच्या लाखोंच्या संख्येत एल्गार यात्रेचा समारोप बुलढाणा येथे होणार असून सरसकट सर्व पिकांना एकरी दहा हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी.सोयाबीनला प्रति क्विंटल नऊ हजार रुपये. कापसाला 12 हजार 500 रुपये भाव मिळावा.
या मोर्चामध्ये बळीराजाची ताकद काय असते? ते आम्ही सरकारला दाखवून देऊ, सोयाबीन, कापूस, संत्री उत्पादकांच्या मागण्या सरकारने जर मान्य केल्या नाही तर सरकार मधल्या मंत्र्यांना आम्ही रस्त्यावर फिरणे मुश्किल केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देण्यात आलाय.पीक विमा कंपन्यांनी यावर्षी आम्हाला फसवलं आहे. कंपन्यांच व सरकारचं साटलोट आहे, सगळ्या मंत्र्यांना हप्ते जातात. यामध्ये केंद्र सरकार सहभागी आहेत. दहा वर्षात जर पीक विमा कंपनीच टेस्ट ऑडिट केलं तर राफेल पेक्षा मोठा स्कॅम या विमा कंपनीचा घोटाळा आहे, सरकार त्यामध्ये सहभागी आहे. या विमा कंपन्यांना सरकार पाठीशी का घालतयं? ही विमा कंपन्यांची योजना मंत्रांच्या कल्याणासाठी आहे, असा आरोप तुपकर यांनी केला आहे.
: