Powder Smart 2600 मॅट्रिक टन उपलब्ध शेतकऱ्यांना रासायनिक खते मिळत नसल्याने संतप्त वंचित बहुजन युवा आघाडी पदाधिकारी यांनी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांच्या नेतृत्वात जिल्हा कृषी अधिकारी ह्यांना घेराव घातला आणि जिल्ह्यातील विविध कृषी केंद्रावरील स्ट्रिंग ऑपरेशनचे व्हिडिओ दाखवून थेट गाडीवर बसवून कृषी केंद्रात धाव घेतली आणि गोडावूनचा पंचनामा करायला भाग पाडले. शेतकऱ्याची फसवणूक कराल तर अधिकारी ठोकून काढू असा इशाराही यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीने दिला आहे. तर आज जिल्हा कृषी अधिकारी शंकर किरवे ह्यांना सादर करून धारेवर धरले तर शासनाचे ऑनलाईन प्रणाली मध्ये 2600 मॅट्रिक टन साठा उपलब्ध असताना विविध केंद्रावर शेतकऱ्याना युरिया दिला जात नसल्याचे व्हिडिओ कॉल वर दाखवले. तातडीने जिल्हा कृषी अधिकारी कीरवे आणि जिल्हा परीषद कृषी विकास अधिकारी साळके ह्यांना कार्यकर्त्यांनी कार्यालया April काढून दुचाकीवर बसवून Vlog कृषी सेवा केंद्र येथे नेले, प्रत्यक्ष 46 टन साठा ऑनलाईन दिसत असताना संजय कृषी सेवा केंद्र येथे एकही बॅग उपलब्ध नसल्याचे केंद्र संचालक ह्यांनी सांगितले. त्यावर जिल्हा कृषी अधिकारी ह्यांनी स्वत:चा परिचय देत त्याचे रेकॉर्ड तपासले असता आधार कार्ड आणि थंब व्हेरिफिकेशन शिवाय वितरीत केला असल्याचे सिद्ध झाले. आणि पंचायत समिती तालुका कृषी अधिकारी मोघाड ह्यांचे निर्देश नुसार आधार व्हेरिफिकेशन शिवाय वाटप करण्यात आले असे धक्कादायक माहिती केंद्र चालक ऑपरेटर ह्याने केली होती... तर त्यावर गोडावून तपासणीत 23 पोते युरिया उपलब्ध असल्याचा पंचनामा करायला भाग पाडले. जिल्हाभर कृत्रिम खत टंचाई असून शेतकऱ्याची लूट चालवली आहे... तर कृषी अधिकारी ह्यात सहभागी असून कमिशन घेत असल्याने शेतकऱ्यांची लूट चालवली आहे, कृषी विभागाने हे धोरण न बदलल्यास अधिकारी ठोकून काढण्याचा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीने दिला आहे.