अवकाळीमुळे फुलांच्या किंमतीत वाढ l flower prices gone up I Maxkisan
लग्नसराई पाहता फुलांच्या दरात वाढ झाली असून मागणीही वाढली असल्याचे फुल विक्रेत्यांकडून सांगण्यात आले आहे...
ऐन लग्नसराईच्या(wedding) तोंडावर फुलांच्या किंमती या वाढल्या आहेत. अवकाळी पावसामुळे (unseasonal rains) आवक कमी झाल्याने दर वाढले आहेत. याचा फटका हा व्यापाऱ्यांना(traders) बसत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 25 टक्क्यांनी दरवाढ झाली आहे. तर 10 ते 15 रुपये किलो दर असणाऱ्या झेंडूच्या फुलांचा दर 25 ते 40 रुपयांवर पोहोचला आहे. त्याचसोबत फुलांचा भाव पाहता हारांच्या किंमतीही वधारल्या आहेत. सहा फूट लांबीच्या हाराची किंमत 40 रुपये तर मध्यम आकाराचा हार हा 20, गुलाब टाकून बनवलेला हार 50, गुलाब, लिलीच्या फुलांचा हार 250 रुपयांपर्यंत आहे. तर जरबेरा, गलंडा, शेवंती, जास्वंदी, मोगरा, निशिगंधा ही फुले बाहेरून विक्रीसाठी येत आहे. लग्नसराई पाहता फुलांच्या दरात वाढ झाली असून मागणीही वाढली असल्याचे फुल विक्रेत्यांकडून सांगण्यात आले आहे, पहा MaxKisan चा स्पेशल रिपोर्ट.....