मार्च मधील'अवेळी पाऊस' नैसर्गिक आपत्तीच: शेतकऱ्यांना 177 कोटींची भरपाई राज्य सरकारची मदत...
आदेश कालच म्हणजे 10 तारखेला काढण्यात आले आहेत.यात राज्यातील दोन लाख 25 हजार 147 नुकसान शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत दिली जाणार आहे.;
गेल्या मार्च महिन्यात दोन वेळा राज्यातील 28 जिल्ह्यांना अवकाळी पाउस आणि गारपिटीचा ( rains and hailstorm)मोठा फटका शेतकऱ्यांना बसला होता. शेतीच मोठं नुसाकान झालं होतं.त्याची भरपाई म्हणून छत्रपती संभाजी नगर, नाशिक, अमरावती , पुणे या चार महसुली विभागांसाठी 177 कोटी 80 लाख एवढा निधी या विभागांना वितरीत करण्यात आला आहे.
याबाबतचे आदेश कालच म्हणजे 10 तारखेला काढण्यात आले आहेत.यात राज्यातील दोन लाख 25 हजार 147 नुकसान शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत दिली जाणार आहे.
4 ते 8 मार्च, तसेच 16 ते 19 मार्च या दरम्यान दोन वेळा अवकाळी पाऊस आणि गारपीठं झाली होती यात शेतकऱ्यांचं हातच पीक वाया गेल होत. मोठं नुकसान झालं होतं. शेतकाऱ्यांसमोरील अवेळी नैसर्गिक आपत्ती अजूनही सुरूच आहे. शेतकऱ्यांसमोर हे चक्र चालूच आहे.
शेतकऱ्यांना अवकाळी आणि नैसर्गिक आपत्तीची तातडीची भरपाई वेळेत मिळत नसल्याने सरकारवर कायम टीकेचे झोड उठत असते हे टाळण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळवण्यासाठी नुकतंच राज्य सरकारने मंत्रिमंडळात निर्णय घेतला होता की नैसर्गिक आपत्ती ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत साठी ठोस धोरण घेण्यात आला.त्यानुसार शेतकाऱ्यांवरील आपत्ती पहिल्यांदाच 'अवेळी पाऊस' ही नैसर्गिक आपत्ती घोषित केली होती.त्या आधारे सर्व महसूल विभागाकडून
भागात किती नुकसान झाले त्याची माहिती मागवण्यात आली होती, त्याचा अहवाल सरकार कडे आल्यानंतर शेतकऱ्यांना 177 कोटींची मदत देण्यात येणार आहे.
कोणत्या विभागाला किती मदत -
1)छत्रपती संभाजी नगर - 84 कोटी 71 लाख 19 हजार
2)नासिक- 63 कोटी 9 लाख 77 हजार
3) अमरावती- 24 कोटी 57 लाख 95 हजार
4) पुणे- 5 कोटी 37 लाख 70 हजार
दोन लाख 25 हजार 147 शेतकऱ्यांना दोन हेक्टर च्या मर्यादित मदत मिळणार आहे.पडझड झालेल्या घरांसाठी 38 लाख , पशुधनची अडीच लाख भरपाई मिळणार आहे.