अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची उडाली तारांबळ
ऐन हिवाळ्यात राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली आहे. थंडीच्या महिन्यात आलेल्या पावसामुळे अनेकांना स्वेटरऐवजी छत्री घेऊन बाहेर पडण्याची वेळ आली आहे. पावसाने रायगड जिल्ह्यात अचानक हजेरी लावली. या पावसाचा जोर प्रामुख्याने जिल्ह्याच्या उत्तर भागात होता. परतीच्या पाऊसधारा बरसल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन उष्म्याने हैराण झालेल्या जनतेला दिलासा मिळाला, मात्र पोटरीला आलेले भातपीक आणि त्याचबरोबर फुलोरा धरण्याच्या अवस्थेत मोठे नुकसान झाले आहे, प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा रिपोर्ट...;
मागील वर्षभरापासून ऋतुचक्र पूर्णपणे बदलले आहे, कधी उन्हाळ्यात पाऊस, तर कधी पावसाळ्यात कडक उन्ह तर हिवाळ्यात मुसळधार पाऊस अशी वातावरणातील परिस्थिती व हवामानबदल ऋतुचक्र बदलल्याचे संकेत देत आहे. सुधागड पाली सह जिल्ह्यात ऐन थंडीच्या दिवसात पावसाने हजेरी लावली, व हवेत प्रचंड गारवा निर्माण केला. ऐन हिवाळ्यात राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली आहे. थंडीच्या महिन्यात आलेल्या पावसामुळे अनेकांना स्वेटरऐवजी छत्री घेऊन बाहेर पडण्याची वेळ आली आहे.
पावसाने रायगड जिल्ह्यात अचानक हजेरी लावली. या पावसाचा जोर प्रामुख्याने जिल्ह्याच्या उत्तर भागात होता. परतीच्या पाऊसधारा बरसल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन उष्म्याने हैराण झालेल्या जनतेला दिलासा मिळाला, मात्र पोटरीला आलेले भातपीक आणि त्याचबरोबर फुलोरा धरण्याच्या अवस्थेत असलेल्या भातपिकाला काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता शेतकर्यांकडून व्यक्त होत आहे. तर काही शेतकर्यांनी तयार झालेल्या भातपिकाची कापणी केली असल्याने ते भिजून गेले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत होतं. रायगड़ जिल्ह्यातील अनेक तालुक्यात व विविध भागात परतीच्या पावसाने हजेरी लावली. पाली सुधागड, परळी, जांभूळपाडा, नांदगाव, उद्धर, शिहू, बेणसे ,चोळे गांधे, झोतिरपाडा, कुहिरे, कडसुरे, आंबेघर, वणी, यासह काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे हवेत काहीसा गारवा निर्माण झाला आहे. मात्र रब्बी पिकांचे यामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान बदलाचा सर्वात मोठा फटका शेतकरी वर्गाला बसतोय, कधी वादळे, कधी अवकाळी पाऊस, कधी अतिवृष्टी तर कधी परतीचा पाऊस यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गळून पडतो.
भातशेतीचे उत्पादनात घट झालीच, मात्र अशीच परिस्तिती राहिली तर कडधान्य, वाल आदी पिके देखील अवकाळी पावसाने अडचणीत येणार आहेत. नैसर्गिक व आस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारची मदत देखील तुटपुंजी मिळते तर कधी त्याच्या पदरी निराशाच येत असते. सरकारने शेती व शेतकरी वाचवण्यासाठी आवश्यक ते धोरण राबविले पाहिजे, कारण शेतकरी जगला तरच देश जगेल अशी जगमान्य परिस्थिती सरकारने जाणली पाहिजे. व शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे अशी मागणी जोर धरत आहे.
रायगडात खरीपासाठी १ लाख १४ हजार हेक्टरवर पेरणी
रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यात खरीप हंगामासाठी जिल्ह्यात एकूण 1 लाख 14 हजार 443 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले होते. जिल्ह्यात लागवडीखालील सर्वाधिक क्षेत्र हे भात पिकाखाली असून भात पेरणी 1 लाख 5 हजार 261 हेक्टर इतक्या क्षेत्रावर करण्यात आल्याची माहिती मिळतेय.
त्या खालोखाल 7128 हेक्टरवर नाचणी, 975 हेक्टर इतर तृणधान्य, 906 हेक्टर तूर, 173 हेक्टर इतर कडधान्य लागवड करण्यात आलीय. रायगड जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र 6 लाख 86 हजार 892 हेक्टर इतके आहे.
निव्वळ पेरणीखालील क्षेत्र 2 लाख 1 हजार 322 हेक्टर इतके आहे.
खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र 1 लाख 41 हजार 200 हेक्टर
रब्बी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र 21 हजार 100 हेक्टर इतके आहे.