बीड जिल्ह्यात अवकाळी पावसाचे थैमान...!

हवामान विभागाकडून आगामी काही दिवसात चक्रीवाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून बीड जिह्यातल्या काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली.;

Update: 2024-03-31 10:16 GMT

राज्यात मराठवाड्यातील काही भागात सध्या हवामान खात्याकडून अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात काही ठिकाणी आज सकाळच्या वेळी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदारपणे हजेरी लावली. या अवकाळी पावसाच्या येण्याने गेवराई तालुक्यात एका मुलाचा वीज कोसळुन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, तर दुसरीकडे आष्टी तालुक्यात एका बैलजोडीचा विज पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली.

आगामी काही दिवसात राज्यात जोरदार अवकाळी पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार बीड जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. या दरम्यान जिल्ह्यातील काही भागात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या जोरदार पावसात विजांच्या कडकडाटामुळे विज कोसळून गेवराई तालुक्यात एका मुलाचा मृत्यू झाला आहे.

आणखी किती दिवस पावसाचा अंदाज ?

ग्रामीण भागात रब्बी हंगामातील ज्वारी, गहु, हरभरा या पिकांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्याला फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचबरोबर ढगाळ वातावरणामुळे आंब्यालाही फटका बसला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान विभागाकडून पुढील दोन दिवस राज्यात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. 

Tags:    

Similar News