दुष्काळात तेरावा
एका बाजूला राज्य दुसऱ्या करून आला त्याला तोंड देत असत त्याला नुकत्याच झालेल्या अवकाळी आणि पाऊस आणि गारपीटने मराठवाड्याच्या १५ तालुक्यातील ४३ हजार हेक्टरला फटका बसला आहे.
सततच्या दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा मोठं संकट उभे राहिले आहे. मराठवाड्यात १८ व १९ फेब्रुवारी रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे १५ तालुक्यांतील ३३२ गावांतील रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक पंचनाम्यानुसार विभागातील जालना, परभणी आणि औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत पिकांचे नुकसान झाले आहे.
मराठवाडा विभागात २९४ गावांना गारपिटीने झोडपले, सर्व जिल्ह्यांत मिळून सरासरीच्या तुलनेत 30 मि.मी.च्या आसपास अवकाळी पाऊस झाला. त्यात जिरायती, बागायती आणि फळपिके मिळून ४३ हजार ३८३ हेक्टर क्षेत्रांवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील ९ पैकी ५ तालुक्यांत १३४ गावांत नुकसान झाले. ३८ हजार २४५ हेक्टरवरील पिकांना गारपीटचा फटका बसला आहे. जालना जिल्ह्यातील ३ तालुक्यांतील ४२ गावांतील ५६८ हेक्टर, परभणी जिल्ह्यातील १ तालुक्यांतील ३८ गावांतील २१५२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.