टोमॅटो शंभरीपार ;पण शेतकऱ्याच्या पदरात काय?
टोमॅटो (Tomato)आणि शंभरी पार केली अगदी मॅकडोनाल्ड(MacDonald) मध्ये ही टोमॅटो दिला जाणार नाही अशी नोटीस आल्यानंतर खरोखर याचा फायदा शेतकऱ्यांना झाला की नाही याचा घेतलेला वेध...;
समाज माध्यमं ( social media) प्रसारमाध्यम (media) आणि मार्केटमध्ये टोमॅटो महागल्यानं सामान्यांचं कंबरडं कसं मोडलं, ग्राहकांच अर्थकारण कसं कोलमडलं याची अर्थशास्त्रीय चर्चा सुरु झाली. आजही टोमॅटो महागच आहे. मॅकडोनाल्ड या सर्वात मोठा कंपनीने टोमॅटो आता आहारात देता येणार नसल्याची नोटीस प्रसिद्ध केली आहे.
पण वर्षभरातील टोमॅटो हंगामांचा विचार करता शेतकऱ्यांच्या हाती फारसं काही लागलं नसल्याचं एका सर्वेक्षणात दिसून आलं आहे.
सध्या भाजीपाला बाजार आणि माध्यमांमध्ये चर्चा आहे ती टोमॅटोच्या वाढलेल्या भावाची. अगदी पंधरा दिवसांपुर्वी ५ रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटो अचानक ५० रुपयांवर गेला. टोमॅटो ने लगेच शंभरी देखील पार केली. मग लगेच सरकार, माध्यम आणि मार्केटमध्ये टोमॅटो महागल्यानं सामान्यांचं कंबरडं कसं मोडलं, ग्राहकांच अर्थकारण कसं कोलमडलं याची अर्थशास्त्रीय चर्चा सुरु झाली. टोमॅटो उत्पादक मालामाल…टोमॅटोने शेतकऱ्यांना केले लखपती या मथळ्याखाली बातम्या फिरू लागल्या. आजही टोमॅटो महागच आहे. पण वर्षभरातील टोमॅटो हंगामांचा विचार करता शेतकऱ्यांच्या हाती फारसं काही लागलं नाही.
टोमॅटो उत्पादक मालामाल झाले की नाही हे ठरवण्यासाठी वर्षभराचा आढावा घ्यावा लागेल. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या हंगामात एक किलो टोमॅटोला १० ते १५ रुपये भाव मिळाला. तर दुसऱ्या हंगामातील भाव ५ ते १० रुपये होता. दुसरीकडे एक किलो टोमॅटोचा उत्पादन खर्च सरासरी १३ रुपयांपर्यंत येतो. बाजारात नेऊन विकेपर्यंतचा खर्च पकडल्यास म्हणजेच टोमॅटो बाजारात नेऊन विकेपर्यंत किलोला १६ ते १७ रुपेय खर्च येतो. म्हणजेच मागील दोन्ही हंगामात शेतकरी पुरते तोट्यात आले.
आधीचे दोन्ही हंगाम तोट्यात गेल्याने लागवड कमी झाली, असे बीड जिल्ह्यातील धुंकवाड येथील शेतकरी राहूल यादव यांनी सांगितले. टोमॅटोचे राज्यात मोठे क्षेत्र आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात टोमॅटोची लागवड केली जाते. चालू हंगामात २० जूननंतर टोमॅटो दरात अचानक वाढ झाली. बाजारातील आवक कमी झाल्याने दर वाढल्याचे शेतकरी, व्यापारी आणि विक्रेते सांगत आहेत.
देशात एप्रिल महिन्यापासून वातावरणात मोठे बदल होत आले. बहुतांशी भागात उष्णतेची लाट होती. याचा फटका भीजापाला पिकांसह टोमॅटो पिकालाही फटका बसला. जून महिन्यात पावसाने पाठ फिरवली. याचा चालू हंगामातील उत्पादकतेवर परिणाम झाला. वर्षात अनेक शेतकरी टोमॅटोचे तीन हंगाम घेतात, असे शेतकऱ्यांनी सांगितले. पण पहिले दोन हंगाम तोट्यातच गेले. त्यामुळे तिसऱ्या हंगामात लागवडी घटल्या, असे नगर जिल्ह्यातील सारोळा अडवाई येथील शेतकरी बी. एन. फंड यांनी सांगितले.
आधीच्या दोन हंगामांमध्ये टोमॅटोला चांगला भाव नव्हता. त्यामुळं हरियाणा, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये शेतकऱ्यांनी टोमॅटोऐवजी बिन्सला पसंती दिली होती. तसच बिपरजाॅय चक्रीवादळामुळे गुजरात, राजस्थान आणि इतर काही भागातील टोमॅटो पिकाचे नुकसान झाले. या सर्व घटकांमुळे बाजारतील आवक २० जूननंतर कमी झाली. यामुळे टोमॅटो दरात मोठी तेजी आली.
टोमॅटो उत्पादक मालामाल झाले की नाही हे ठरवण्यासाठी वर्षभराचा आढावा घ्यावा लागेल. वर्षभराचा विचार करता म्हणजे चालू वर्षातील तीनही टोमॅटो हंगामाचा विचार करता फारसं काही हाती लागलं नाही, असं शेतकरी सांगतात. एकरी सरासरी उत्पादन आणि तिन्ही हंगामात मिळालेल्या भावाचं गणित केलं तर किलोला १७ ते २० रुपये भाव मिळाला. पण हा सरासरी भाव त्याच शेतकऱ्यांचा आहे ज्यांनी चालू हंगामात ५० ते ६० रुपयांनी टोमॅटो विकला. ज्यांनी चालू हंगाम घेतला नाही ते पहिल्या दोन हंगामांमध्ये पुरते देशोधडीला लागले.
"वर्षभरात टोमॅटो उत्पादकांना मिळलेला भाव आणि उत्पादन खर्च पाहता शेतकऱ्यांच्या हाती विशेष काही लागलं नाही, हे स्पष्ट आहे.
चालू हंगामात बदलते तापमान, गारपीट, पाऊस, पावसाचा खंड याचा मोठा फटका पिकाला बसला. आधीच्या हंगामात एक एकरात ४ हजार क्रेट माल निघाला होता. चालू हंगामात मात्र ८०० क्रेट मिळतील, असं एकंदरीत मार्केटमधील चbenefits
.
"उत्पादनात पाच पटीने घट झाली. त्यामुळे सध्या भाव जास्त दिसत असला तरी हाती आलेले उत्पादन आणि उत्पादन खर्चाचा विचार करता हंगाम बरोबरीतच जातो की काय असं वाटतं'
- राहूल यादव, टोमॅटो उत्पादक, धुंकवाड, जि. नगर
टोमॅटोचे पहिले दोन हंगाम तोट्यात गेले. चालू हंगामात चांगला भाव मिळत आहे. पण उत्पादनात मोठी घट झाली. तीनही हंगामातील उत्पादन खर्च आणि तीनही हंगामातील सरासरी भाव पाहता बरोबरीच झाली. शेतकऱ्यांना फार काही नफा झाला नाही. आपण चर्चा केवळ सध्याच्या भावाची करतो. अगदी १५ दिवसांपर्यंत टोमॅटोला मातीमोल भाव होता, त्याचा विचार केला तर ही गोष्ट लक्षात येईल.
टोमॅटो दरवाढीबाबत बोलताना प्रगतीशील शेतकरी शिवाजी आवटे म्हणाले,"
1 जून ला आपण टोमॅटो बाजार भाव जून ते सप्टेंबर पर्यंत काय रहाण्याची शक्यता आहे.या विषयावर VDO बनवला होता त्या मध्ये आपण टोमॅटो लागवड करण्यासाठी पुढील तारीख 5 सप्टेंबर ते 5 आक्टोंबर अशी सुचवली आहे सध्या ची परिस्थिती पहाता तिथे लागवडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
साधारण 2 जुलै 2021 पासून आपण जेव्हा जेव्हा टोमॅटो लागवडीसाठी आदर्श तारखा सुचवल्या होत्या त्या बऱ्यापैकी सक्सेस झाल्या आहेत. 2 जुलै 2021 पासून आपण ज्या ज्या तारखा टोमॅटो लागवडीसाठी सुचवल्या होत्या त्या बऱ्यापैकी सक्सेस झालेल्या आहे.सध्याची परिस्थीती पहाता 5 सप्टेंबर ते 5 आक्टोंबर या कालावधीत टोमॅटो लागवड वाढण्याची शक्यता आहे.त्यामुळे 5 सप्टेंबर ते 5 आक्टोंबर ही तारीख फ्लॉप ठरू शकते, असं आवटे यांनी स्पष्ट केलं आहे.
- बी. एन फंड, शेतकरी, सारोळा अडवाई, जि. नगर