तेजी असो मंदी; पीक शेवट पर्यंत ताकदीने जोपासा:शिवाजी आवटे, प्रगतिशील शेतकरी आणि भाजीपाला विश्लेषक

Update: 2023-06-15 02:57 GMT

 मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मार्केटमध्ये टोमॅटोच्या गाड्या ओतून दिल्या होत्या. जरा गेल्या वर्षी (2022) मे महिना आठवण पहा कॅरेटचा भाव हजार रुपये होता. शेतकऱ्यांनी लागवड वाढीबरोबरच टोमॅटोवर अफाट खर्च केला. परिणामी जुलै 2022 मध्ये टोमॅटो मातीमोल झाला. यंदा 10 एप्रिल ते 5 मे जी आपली टोमॅटो लागवडीची आदर्श तारीख होती ते प्लॉट सुद्धा काही शेतकऱ्यांनी सोडून दिले. मी मात्र प्रत्येकाला सांगत होतो 15 जून नंतर टोमॅटो शॉर्टेज होऊ शकते प्लॉट सोडून काय मिळणार आहे. आज 15 जून नंतर टोमॅटोला चांगले भाव मिळणार आहेत.तात्पर्य एकच तेजी असो मंदी असो एकदा की कुठल्याही पिकांची लागवड केली की ती शेवट पर्यंत एकाच ताकदीने जोपासली पाहिजे.सर्वात जास्त दुःख ज्यांनी अर्ध्यावर प्लॉट सोडून दिले त्यांचे वाटतं, अशा शब्दात मंचरचे भाजीपाला उत्पादक शेतकरी आणि बाजार विश्लेषक शिवाजी आवटे यांनीvMaxKisan कडे टोमॅटोचे जून 2023 ते सप्टेंबर 2023 च्या बाजारभावाच्या अंदाजांचे विश्लेषण केलं आहे..

Full View

Tags:    

Similar News