टोमॅटोला कवडीमोल भाव, शेतकरी हतबल
काही महिन्यापूर्वी टोमॅटोला प्रति २० किलोला ४ ते ५ हजार रुपये भाव मिळत होता.याकाळात काही शेतकरी मालामाल झाले.यावेळी शेतकरी अतिशय आनंदी होता.माञ केंद्र सरकारने टोमॅटोचे आयात धोरण राबविल्याने हे दर हळूहळू कमी होउन आज तो प्रती २० किलो जाळीला ७०ते ६० रुपयावर येऊन ठेपले आहे.
: काही महिन्यापूर्वी टोमॅटोला प्रति २० किलोला ४ ते ५ हजार रुपये भाव मिळत होता.याकाळात काही शेतकरी मालामाल झाले.यावेळी शेतकरी अतिशय आनंदी होता.माञ केंद्र सरकारने टोमॅटोचे आयात धोरण राबविल्याने हे दर हळूहळू कमी होउन आज तो प्रती २० किलो जाळीला ७०ते ६० रुपयावर येऊन ठेपले आहे.त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी १०००,१२००,१५०० रुपयेचे स्वप्न बघितले त्या शेतकऱ्यांच्या हाती मात्र घोर निराशाच लागली आहे.आता सध्या प्रति किलो टोमॅटोला २ ते ३ रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथील प्रगतशील शेतकरी सोमनाथ भीमराज जाधव यांनी दुष्काळी परिस्थिती असतानाही स्वतःच्या १ एकर शेतात टोमॅटोची उत्तम प्रकारची लागवड केली.चांगला भाव मिळेल या अपेक्षेने त्यांनी टॉमेटो बागही फुलवली.मात्र बाजारभाव पडल्याने त्यांना आता टॉमेटो फेकून देण्याची वेळ आली आहे.टोमॅटो शेतीसाठी लागणारे पाणी,औषध फवारणी,मजुरांवरील खर्च तसेच.टोमॅटो मार्केटला नेण्यासाठी येत असलेला खर्च हे सर्व सध्या मिळत असणाऱ्या टोमॅटो दरापेक्षा जास्त येतं असल्याने शेतकरी सोमनाथ जाधव हवालदिल झाले आहेत.शेतकऱ्यांना टोमॅटो शेती करणं अवघड व जिकरीचे बनलं आहे.सरकारने शेतकऱ्यांना निदान हमीभाव तरी द्यावा जेणेकरून शेतकरी जगेल.अन्यथा शेतकऱ्याला आत्महत्याशिवाय पर्याय राहणार नाही असे मत बोलताना शेतकरी जाधव यांनी व्यक्त केले आहे.सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये.शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे त्याला योग्य तो मोबदला मिळालाच पाहिजे मात्र शासन आमच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे शेतकऱ्यांनी आपल्या कैफियतद्वारे आपली व्यथा मांडली आहे.