टोमॅटो आवक घटल्याने भाव चढेच...
एपीएमसी मार्केटपेक्षा पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाज्यांचे दर कमी असून पावसाळ्यत टोमॅटोची आवक ही कमी होत असून टोमॅटोच्या मालाच्या गाड्या कमी प्रमाणात दाखल होत असल्याने भाव वाढत आहेत.;
देशभरात टोमॅटोचे (Tomato) दर हे वाढताना दिसत आहेत, त्यामुळे काही ग्राहक खरेदीकडे पाठ फिरवत असून व्यापाऱ्यांसह ग्राहकांचे (customer)सुद्धा नुकसान होत आहे,नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती (APMC) आणि पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोसह अनेक भाज्यांचे दर हे वाढले आहेत, सध्या चांगल्या प्रतीच्या टोमॅटोचे दर हे १५० रुपये असून किरकोळ टोमॅटो १२० ते १०० रुपये किलोने विकला जातो, त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.-एपीएमसी मार्केटपेक्षा पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाज्यांचे दर कमी असून पावसाळ्यत टोमॅटोची आवक ही कमी होत असून टोमॅटोच्या मालाच्या गाड्या कमी प्रमाणात दाखल होत असल्याने भाव वाढत आहेत. तसेच महिनाभर भाज्यांचे असेच दर राहणार असल्याचे पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण घरत यांनी म्हटले.
Tags