हे सरकार शेतकरी विरोधी: नाना पटोले
गेंड्याच्या कातडीचे हे सरकार असल्याचा घणाघातही पाटोलेंनी केला..;
देशातील आणि राज्यातील सरकार निष्ठुर आहे. शेतकऱ्यांच्या विरोधातील हे सरकार आहे. अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. हिंगोली येथील आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्याच्या मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रासंदर्भात ते अकोल्यात बोलत होते. सरकार पीक विमा कंपनीला हजारो कोटी रुपये देत आहेत. शेतात पीक नाही, पाणी नाही म्हणून दिवाळी साजरी कशी करावी? लोक चिंतेत आहेत. सरकारने दुष्काळ घोषित केले. हे राजकीय आहे, वस्तुस्थितीला धरून नाही, असा आरोपही नाना पटोले यांनी केला आहे. गेंड्याच्या कातडीचे हे सरकार असल्याचा घणाघातही पाटोलेंनी केला. आत्महत्या करू नका असं आवाहन शेतकऱ्यांना केलंय, थोडे दिवस थांबा काँग्रेस तुम्हाला न्याय देईल असे आश्वासन सुद्धा दिले आहे.