सरसकटीकरण नको..

कोरोना पाठोपाठ देशात झालेल्या बर्डफ्लू उद्रेकावरून जनसामान्यांमध्ये संभ्रम निर्माण झाले असताना पोल्ट्री विषय अभ्यासक दीपक चव्हाण यांनी परसबाग आणि व्यावसायिक पोल्ट्री मधील फरक स्पष्ट करून सांगितले आहे...

Update: 2021-01-13 08:19 GMT

देशात पोल्ट्रीत दोन प्रकार आहेत. एक बॅकयार्ड म्हणजे परसबागेतील देशी पक्ष्यांचा पोल्ट्री. दुसरा कमर्शियल पोल्ट्री. ब्रॉयलर्स व कमर्शियल लेअर्सचे (अंडी) उत्पादन यातून मिळते. कमर्शियल पोल्ट्री पूर्णपणे बंदिस्त असतो. साधे चिटपाखरूही आत जावू शकत नाही - स्थलांतरित पक्ष्यांचा संपर्क तर खूपच लांबची गोष्ट. बॅकयार्ड पोल्ट्रीतील पक्ष्यांचा शेतात-परिसरात वावर असतो. बॅकयार्ड पोल्ट्रीत देशी पक्ष्यांचा संपर्क कावळे, पोपट किंवा स्थलांतरित पक्ष्यांशी येऊ शकतो.

कमर्शियल ब्रॉयलर्स आणि लेअर्स पक्ष्यांचे उत्पादन एकाप्रकारे Quarantine प्रोसेससारखे होते. ब्रीडर्स फार्मपासून ते ब्रॉयलर्सपर्यंत नियमित लसीकरण होते. आहार-पोषण, संगोपन या गोष्टी संबंधित तज्ज्ञ - व्हेटर्नरी डॉक्टर्सच्या निगराणीत पार पडतात. जैवसुरक्षेचे सर्व नियम पाळले जातात. मालकाच्या परवानगीशिवाय बाहेरचा माणूस आत येवू दिला जात नाही.

भारतीय आहारशैलीत कच्चे मांस खाल्ले जात नाही. ज्या तापमानात आपण चिकन-अंडी शिजवून खातो. त्या तापमानात बर्ड फ्लूचा विषाणू जगत नाही, असे संबंधित डॉक्टर्सनी स्पष्ट केलेच आहे. सर्वसाधारणपणे कमर्शियल पक्ष्यांची विक्री व्यवस्था स्वतंत्र आहे. लिफ्टिंगपासून ते थेट विक्रीपर्यंत देशी पक्ष्यांचा संपर्क येत नाही. मध्यप्रदेश, दिल्ली या राज्यांनी कमर्शियल पक्ष्यांची आंतरराज्य वाहतूक बंद केली आहे. यामुळे ग्राहकांत गैरसमज वाढू शकतो. पोल्ट्री मार्केट्स बंद करू नयेत, असे निर्देश केंद्राने राज्यांसाठी जारी केले असताना सरसकटपणे

कमर्शिअल पोल्ट्रीची वाहतूक बंद करणे योग्य नाही. सरसकटीकरण नको. कमर्शिअल आणि बॅकयार्ड असे वर्गीकरण झाले पाहिजे. दोन्ही प्रकारच्या पोल्ट्रीला संरक्षण, सपोर्ट, सहकार्य मिळावे.

- दीपक चव्हाण,

Similar News