"मॅक्समहाराष्ट्र" च्या बातमीनंतर त्या कुटूंबाला मिळाली मदत

Update: 2024-02-17 14:47 GMT

(Max Maharashtra Imapct) : ग्रामीण भागातल्या एका सर्वसामान्य कुटूंबातल्या शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून दि. १० जून २०२३ रोजी गळफास लाऊन आत्महत्या केली, त्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटूंबातल्या समस्या वाढल्या, सर्व जबाबदाऱ्या एकट्या पत्नीवर पडल्या. अशात सरकारकडून आर्थिक सहाय्य करण्याचे नुसतेच आश्वासने मिळत होती पण प्रत्यक्ष सहकार्याची काही मदत मिळत नव्हती. पतिच्या मृत्युनंतर तब्बल ७ महिन्यापर्यंत त्या महिलेला कुठली शासकीय आर्थिक मदत मिळाली नाही. माध्यमंही अशा बातम्यांकडे, पाहत नव्हते, त्यांना फक्त राजकीय वर्तुळातल्याच बातम्या द्यायच्या असतात, हा काय बोलला ?, तो काय बोलला ?, पण गोरगरीबांच्या या व्यथांकडे लक्ष द्यायला माध्यमांकडे वेळ कुठे आहे ?

पण "मॅक्समहाराष्ट्र" ने या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटूंबाला भेट देऊन त्यांची व्यथा मांडली. मॅक्स वूमेनच्या संपादक प्रियदर्शनी हिंने यांनी सदरील घटनेचा पाठपुरावा करून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीची मुलाखत दि. २४ डिसेंबर २०२३ रोजी "मॅक्समहाराष्ट्र" चॅनलवरून घेतली. त्यानंतर केवळ २२ दिवसांच्या आत म्हणजेच दि. १५ जानेवारी, २०२४ रोजी त्या परिवाराला १ लाखाची मदत मिळाली. यानंतर त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीने मॅक्समहाराष्ट्र आणि प्रियदर्शनी हिंने यांचे आभार व्यक्त केले. कुठलीच बातमी ही छोटी नसते. त्या बातमीचा प्रभाव काही लोकांचं आयुष्य सावरू शकतो. म्हणूनच मॅक्समहाराष्ट्र आहे जनतेचा आवाज.. तुमचं स्वतःचं प्रभावशाली माध्यम. 

Full View

Tags:    

Similar News