Textile Policy वस्त्रोद्योग धोरणाने विणकरांमध्ये चैतन्य
वस्त्रोद्योग धोरणाचा पैठणी विणकारांना होणार फायदा;
वस्त्रोद्योग धोरण (Textile Policy) जाहीर झाले असून या वस्त्रोद्योग धोरणामुळे येवल्यातील पैठणी विणकारांना विविध योजनांचा फायदा होत आहे.आगामी पाच वर्षाच्या वस्त्रोद्योग धोरणात केंद्र शासनाच्या योजनांना गती देतानाच राज्य शासनानेदेखील त्याला हातभार लावण्याचा निश्चय केला आहे. त्यानुसार विणकर कुटुंबाला २०० युनिटपर्यंत मोफत वीज देणे, गणेशोत्सवात उत्सव भत्ता, वृद्धांना निवृत्तीवेतन, विणकरांना विम्याचे संरक्षण यासह अनेक धोरणात्मक निर्णय शासनाने घेतले आहेत. वीज अनुदान देण्यासह सौर ऊर्जा स्थापनेला व मार्केटिंगलाही प्रोत्साहन देण्यात येणार आहे. या धोरणामुळे पैठणी विणकारांवर नक्कीच सकारात्मक परिणाम होणार आहे, असे पैठणी उत्पादक मनोज ड्युटी आणि जितेंद्र पहिलवान यांनी सांगितले.