हिंगोली जिल्ह्यात यावर्षी पेरणीच्या सुरवातीलाच अनेक बोगस कंपन्यांनी बोगस बियाणे विक्री करुन शेतकऱ्यांची फसवणूक केली होती. त्याच्यापाठोपाठ बोगस औषधी विक्री केली होती. यांच्याविरोधात स्वाभीमानी शेतकरी संघटनेने अनेकवेळा जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयावर बोगस कंपन्या विरोधात कारवाई करा अशी मागणी करुनही कारवाई होत नसल्याने आज जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्क जिवंत बोकड, दोन कोंबड्या,दारु घेऊन अनोखे आंदोलन केले. बोगस कंपन्यांवर कारवाई करायची असेल तर आम्हाला पार्टी द्यावी अशी मागणी अधिकाऱ्यांनी केली असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करत चक्क बोकड, कोंबड्या,दारु घेऊन आंदोलन करण्यात आले.