आदिवासीची 'स्ट्रॉबेरी'ची शेती तुम्ही पाहिलीय का?
स्टॉबेरीची शेती म्हटलं की महाबळेश्वर, पाचगणी आठवते. मात्र, नंदुरबारमध्ये सातपुडा पर्वतरांगेमध्ये आदिवासी बांधवांनी स्टॉबेरीची शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. पाहा मॅक्समहाराष्ट्रचा स्पेशल रिपोर्टे 'नंदुरबारच्या' सातपुडा पर्वत रांगांमध्ये बहतेय 'स्ट्रॉबेरी' शेती;
स्ट्रॉबेरी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर महाबळेश्वर आणि पाचगणी उभा राहते. मात्र, हीच स्ट्रॉब्रेरी नंदुरबार जिल्ह्याच्या सातपुडा पर्वत रांगांमधील अक्कलकुवा तालुक्यातील 'डाब' या गावातील दोन आदिवासी भावांनी 'स्ट्रॉबेरी' लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे.
स्ट्रॉबेरीसाठी दुर्गम भागात योग्य हवामान...
सातपुडा पर्वत रांगांमधील हवामान स्ट्रॉबेरीसाठी पोषक आहे. महाबळेश्वर येथील जसं हवामान आहे. तसं मिळत जुळत हवामान डाब या परिसरात असल्याने स्ट्रॉबेरी लागवड साठी चांगलं असल्याने कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने स्ट्रॉबेरीची लागवड करण्यास डाब येथील दोघा तरुण भावांनी केली.
पारंपरिक पिकांना फाटा देत सुरू केली स्ट्रॉबेरी शेती-
अक्कलकुवा तालुक्यातील डाब येथील टेडया पाडवी, आणि धिरशिंग पाडवी या दोन तरुण भाऊंनी वडिलोपार्जित पारंपरिक पिकांना बाजूला करून स्ट्रॉबेरी लागवडी कडे वळले आहेत. 12 वी पर्यंत शिक्षण झालेल्या टेडया पाडवी आणि शेतात परिश्रम करणारा धिरसिंग यांना शेतात नवंनवीन प्रयोग करण्याची आवड असल्याने स्ट्रॉबेरीच उत्पादन घेण्याची कल्पना सुचली.
सुरुवातीला काही वर्षे पारंपरिक पद्धतीने स्ट्रॉबेरी लागवड केली. मात्र, पाहिजे त्या प्रमाणात यश मिळत नव्हते.
कृषी सहलीचा झाला फायदा...
नंदुरबार कृषी विभागाची मदतीने कृषी सहली मध्ये या दोघा भावांनी सहभाग घेतला. महाबळेश्वर येथे स्ट्रॉबेरी शेतीच शास्रोक्त पद्धतीने आणि नवीन तंत्रज्ञान च प्रशिक्षण घेऊन नव्याने आपल्या गावात स्ट्रॉबेरीची लागवड केली आणि त्यात चांगलं उत्पादन घेत आहेत.
वनपट्यात स्ट्रॉबेरीची लागवड-
पूर्वी वडिलांच्या नावावर असलेली २ एकर आणि वनपट्टा म्हणून मिळालेल्या ४ एकर जमीनीवर गहू, हरबरा अशी पारंपरिक पिके घेतली जात असत. त्या जागी धिरसिंग यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली. नाशिक येथून स्ट्रॉबेरीची रोपे आणली. स्वत: मल्चिंग पेपर आणि ठिंबक सिंचनाची व्यवस्था केली. विजेचा प्रश्न असल्याने त्याला पर्याय म्हणून त्यांनी सौर उर्जाचा वापर केला. नुकसान टाळण्यासाठी किड नियंत्रक चिकट सापळ्यासारख्या पद्धतीचा अवलंब केला.
शेती सहलीच्या माध्यमातून महाबळेश्वर येथील तज्ज्ञ शेतकरी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्याचा फायदा त्यांना मिळाला. स्वतः कुटूंब शेतात काम करीत असल्याने मजुरी कमी लागून नफ्यात वाढ होण्यास मदत मिळतेय.
करार शेतीचा फायदा:
धिरसिंग पाडवी यांना स्ट्रॉबेरी लागवडीसाठी आणखीन शेती ची गरज भासल्याने इतर शेतकऱ्यांनाही जोडून घेत करार शेतीच्या माध्यमातून स्ट्रॉबेरीचे क्षेत्र वाढविले आहे. इतर स्थानिक शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. त्याचा फायदा इतर आदिवासी शेतकऱ्यांनाही होतोय.
पारंपरिक गहू, हरभरा, मका, बाजरी, भात या पिकांपेक्षा स्ट्रॉबेरीला चांगला भाव मिळत असल्याने करार पद्धतीने शेती करणारे आदिवाशी शेतकऱ्यांच्या उत्पनात वाढ झाली आहे.
स्ट्रॉबेरीला मिळतोय चांगला भाव-
स्ट्रॉबेरी पॅकेजिंगसाठी स्थानिक पातळीवर मिळणाऱ्या खोक्यांचा वापर करून स्ट्रॉबेरीची विक्री करण्यात येते. स्थानिक नंदुरबारच्या व्यापाऱ्यांनादेखील स्ट्रॉबेरीची विक्री करण्यात येत आहे. स्ट्रॉबेरीला साधारण ८० ते १२० रुपये प्रतिकिलो असा भाव मिळतो आहे. त्यांना पहिल्यावर्षी सुमारे २ लाख रुपयांचा नफा मिळाला आहे. तर आणखी ३ लाख रुपयांचा नफा मिळण्याची त्यांना अपेक्षा आहे. सातपुडा दुर्गम भागातील आदिवासींनी वेध लागले ते स्ट्रॉबेरीचे क्षेत्र वाढवायचे आणि तिचे ब्रँडींग करून मोठ्या शहरापर्यंत पोहोचवायचे.
आदिवाशींना रोजगार च्या संधी -
स्ट्रॉबेरीची लागवड होत असल्याने स्थानिक आदिवासी मजुरांनाही रोजगार मिळत आहे, यात लागवड, पासून तर स्ट्रॉबेरी काढणी, तसंच पॅकिंग मुळे रोजगाराच्या संधी मिळत आहे. काहींना प्रशिक्षण देऊन काम केली जात आहेत. स्ट्रॉबेरीच क्षेत्र वाढल्यास आणखीन रोजगार मिळतील.
कृषी विभागाची प्रतिक्रिया -
कृषी विभागाचे अधिकारी अविनाश खैरनार यांनी सांगितलं की, पूर्वी येथील आदिवासी शेतकरी पारंपरिक पीक घेत असल्याने पाहिजे. त्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा मिळत नव्हता. सातपुडा मधील डाब या परिसरात स्ट्रॉबेरी साठी योग्य हवामान असल्याचं कृषी विभागाच्या लक्षात आल्यावर स्ट्रॉबेरी च शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन आता 20 ते 25 शेतकरी स्ट्रॉबेरीची शेती करत आहे.
टेट्या पाडवी स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी ची प्रतिक्रिया-
स्ट्रॉबेरी उत्पादक आदिवासी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की, अनेक वर्षे वडिलोपार्जित आम्ही पारंपरिक शेती केली. त्यात आम्ही, गहू, मका, ज्वारी असे पीक घेत होतो. मात्र, उत्पादन कमी मिळत होतं. आम्ही आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन स्ट्रॉबेरीच उत्पादन घेतले आणि त्यात बऱ्यापैकी उत्पादन घेत आहोत. स्ट्रॉबेरीची लागवड वाढवायची आहे.