FarmerSuccess 'एकत्र या,प्रयोग करा, शिका आणि शेअर करा' हीच यशस्वी शेतीची चतुसूत्री

शेतकऱ्यांनी (Farmer)आधी एकत्र येणे गरजेचे आहे. त्यानंतर समस्येमधून वाट कारणारे प्रयोग प्रत्याक्षिकं (demonstrations)केली पाहीजेत, त्यातून शिका व बोध घ्या आणि त्यानंतर अन्य शेतकऱ्यांपर्यंत त्याच प्रचार-प्रसार म्हणजे शेअर करा.हीच यशाची चतुसूत्री 'तासगाव चमन' (Tasgaon Chman) समूहाचे संस्थापक रमेश माईनकर (Ramesh Mainkar) हे सर्व कृतीतून उतरवले म्हणजे आधी केले आणि मग सांगितले या प्रकारात... क्लबहाऊस (Clubhouse) आणि चाटजीबीटी (ChatGBT)च्या माध्यमातून शेतकऱ्यांनी केलेल्या परीवर्तनाच्या नोदी खास MaxKisan साठी

Update: 2023-04-03 03:26 GMT


'तासगाव चमन' समूहाचे कृषी तंत्रज्ञान विस्ताराचे मॉडेल अन्य ठिकाणीही रेप्लिकेट करता येण्यासारखे आहे.माईनकर सर सांगतात, की सरकारी मदत हा दुय्यम भाग आहे. सध्या त्यास फार अवाजवी महत्त्व दिले जाते...त्याआधी शेतकऱ्यांना सजग करणे, प्रबोधन करणे महत्त्वाचे आहे, ज्यामुळे तो स्वत:च्या पायावर उभा राहू शकेल.

चॅटजीपीटीबाबत 'तासगाव चमन' समूहाचे संस्थापक रमेश माईनकर यांची निरीक्षणे...

१.गुगलमध्ये जी माहिती शोधायला दोन तास लागतात, ती माहिती चॅटजीपीटी वेबसाईटमध्ये नेमके प्रश्न विचारून पाच-दहा मिनिटात काढता येते.

२.गुगलमध्ये बऱ्याचदा दोन साईट्समधील माहिती विसंगतीपूर्ण असू शकते, किंवा त्यातील तपशील गोंधळात टाकणारे असतात, चॅटजीपीटीत मात्र सलग फ्लो असलेली एकटाकी मजकूर वाचायला मिळतो, जो खूप उपयुक्त असतो.



 

३.द्राक्ष शेतीबाबत #Chatgpt तून मिळणाऱ्या माहितीचा तपशील हा युरोप अमेरिकेतील क्रॉप अॅग्रोनामीशी जास्त सयुक्तिक ठरतो, जुळतो...भारतात येणाऱ्या रोगकिडीसंदर्भात उपाययोजनात्मक ठरू शकतील अशा लोकल जेनेरिक उपायाबाबत माहिती कमी प्रमाणात मिळते.

४.अभ्यासक किंवा सल्लागार लोकांसाठी चॅटजीपीटी जास्त फायद्याचे आहे. आधी अभ्यास असला तर जास्ती प्रभावीपणे माहिती काढता येते. शेतकऱ्यांसाठी चॅटजीपीटीतले ज्ञान हे मराठीत भाषांतरीत करून सांगितले पाहिजे.

(शेतकरी ते शेतकरी कृषी तंत्रज्ञान विस्तारासंदर्भात 'तासगाव चमन' समूहाच्या कामाबाबत प्रस्तूत पेजवर थोडक्यात माहिती दिली आहे. जरूर पहा.)

चॅटजीपीटीच्या अनुषंगाने माहितीचा - ज्ञानाचा अॅक्सेस वाढला आहे, मात्र तो बांधावर उतरवायचा असेल, तर ग्राऊंडवर काम करावे लागेल. त्यासाठी 'एकत्र या,प्रयोग करा, शिका आणि शेअर करा' ही चतुसूत्री अंगिकारावी लागेल, असे माईनकर सांगतात.



 

पुढील काळात तासगाव चमनच्या माध्यमातून दर पंधरा किलोमीटवर पथदर्शक ठरतील असे द्राक्ष प्लॉट उभे करण्यावर भर राहील. अशा प्लॉटमधील नोंदी, निरीक्षणे सार्वत्रिक केल्या जातील. द्राक्ष शेतीच्या संदर्भाने कुठलीही थेअरी, व्हरायटी, एखादे प्रॉडक्ट किंवा प्रॅक्टीसची उपयुक्तता समजण्यासाठी असे पथदर्शक प्लॉट उपयोगात येतील.

'तासगाव चमन' समूहाचे संचालक रमेश माईनकर सरांनी आधी काम उभे केले आणि त्यातून शेतकऱ्यांसाठी एक चतुसूत्री सांगितली, ती अशी -

१. संघटित व्हा

२. प्रयोग, प्रात्यक्षिकं करा

३. त्यातून शिका

४. शेअर करा

क्लबहाऊस या अॅप बेस्ड अॅप बद्दल माहीती देताना कृषी विश्लेषक दिपक चव्हाण सांगतात.. क्लबहाऊस हे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. कारण इथे 'वन वे' कम्युनिकेशन नाही. प्रत्येक शेतकऱ्याला बोलण्याची संधी मिळू शकते. किंवा शेतकरी त्यांच्या गरजेच्या विषयावर रूम आयोजित करून चर्चा करू शकतात. आपले स्वतंत्र क्लब (ग्रुप) स्थापन करू शकतात. शेकडो शेतकरी या चर्चा ऐकू शकतात. हा सर्व लाईव्ह, रिअल टाईम मामला आहे.


 


तंत्रज्ञान प्रसार किंवा शेतीविषयक माहितीची देवाणघेवाण सर्वांच्या सहभागाने होवू शकते. हवामानातील टोकाच्या बदलांमुळे येणाऱ्या अडीअडचणींवर रिअल टाईम चर्चा आणि सोल्यूशन यासाठी तर सर्वांत सशक्त माध्यम आहे. येत्या काही वर्षांत शेतकरी सर्वाधिक वेळ कुठे देतात याची पाहणी झाली तर त्यात क्लबहाऊस अव्वल राहील. आज डिजिटल मीडिया, त्यातही सोशल मीडिया हा शेतीचा व शेतकऱ्यांचा मुख्य मीडिया - माध्यम झाले आहे. ऑडिओ माध्यमाची कमतरता क्लबहाऊसच्या रुपाने भरून निघाली आहे.



 

क्लबहाऊसवर रिजिस्ट्रेशन केल्यानंतर अकाऊंट सुरू व्हायला एकदोन दिवसांचा वेळ लागतो. इथे खरी माहिती भरणे अपेक्षित आहे. नंतर नाव किंवा तपशील बदलणे अवघड असते. आपले मोबाईल नंबर मित्र जर अॅप वर असतील, तर तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांना नोटिफिकेशन जाते. ते तुमची रिक्वेस्ट मंजूर करू शकतात.

या समूहाच्या क्लबहाऊस ऑडिओ अॅपवरील ग्रुपवर द्राक्षविषयक शेकडो व्याख्याने - चर्चा यांचा खजिना आहे. दररोज शेकडो शेतकरी ते रिप्ले करून ऐकतात.

https://www.clubhouse.com/event/PvB45jk6?utm_medium=ch_event&utm_campaign=ajg9zePhmtayBcgJSWUY5A-657772


Tags:    

Similar News