साठवणुकीतला कांदा होतोय खराब

कांदा खराब होत असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट;

Update: 2023-08-31 09:44 GMT

बदलते हवामान तसेच मागील काही दिवसांपूर्वी बाजार समित्या बंदचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून येवला तालुक्यातील नगरसुल गावातील कांदा उत्पादक शेतकरी संजय गंडाळ यांचा कांदा खराब होत असल्याने कांदा जनावरांना खायला देण्याची वेळ आली आहे. कांद्याला भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी कांदा साठवला होता. मात्र, साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने अक्षरशः कांदा वाळवण्याची देखील वेळ या शेतकऱ्यावर येत असून खराब झालेला कांदा अक्षरशः जनावरांना खाऊ घालत आहेत. त्यामुळे हा कांदा उत्पादक शेतकरी मोठा अडचणीत सापडला आहे, कांदा उत्पादक शेतकरी संजय गडाळ आणि विशाल गंडाळ यांनी व्यक्त केलेल्या भावना..

Full View

Tags:    

Similar News