राज्यात अवकाळी पावसाचा 12 जिल्ह्यांना फटका शेकडो हेक्टर पीक जमीनदोस्त..

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. तीन दिवसात दुसऱ्यांदा तर 15 दिवसांत तिसऱ्यांदा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावून घेतला आहे.;

Update: 2023-04-10 10:44 GMT
राज्यात अवकाळी पावसाचा 12 जिल्ह्यांना फटका शेकडो हेक्टर पीक जमीनदोस्त..
  • whatsapp icon

मार्च च्या शेवटच्या आठवड्यात वादळी वारा आणि गारपीट मुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान  झालं होतं. त्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आणि आता पुन्हा दुसऱ्या आठवड्यात पावसाने बळीराजाच कंबरड मोडलं. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र , उत्तर महाराष्ट्र काल पडलेल्या पावसाने मका, टरबूज, उन्हाळी बाजरी , कांदा,मिरची, केळी ,आंबा,पीक जमीनदोस्त केलीत.यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अस्मानी संकटामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.... प्रतिनिधी संतोष सोनवणे यांचा ग्राऊंड रिपोर्ट.....

Full View

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. तीन दिवसात दुसऱ्यांदा तर 15 दिवसांत तिसऱ्यांदा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावून घेतला आहे.

मार्च च्या शेवटच्या आठवड्यात वादळी वारा आणि गारपीट मुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं होतं. त्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आणि आता पुन्हा दुसऱ्या आठवड्यात पावसाने बळीराजाच कंबरड मोडलं.

विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र , उत्तर महाराष्ट्र काल पडलेल्या पावसाने मका, टरबूज, उन्हाळी बाजरी , कांदा,मिरची, केळी ,आंबा,पीक जमीनदोस्त केलीत.यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अस्मानी संकटामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा-काकोडा परिसरात रात्री मोठ्या प्रमाणात वादळी वारा आणि गारपीट मुळे मका आणि केळी जमीनदोस्त झाली.शेतकऱ्यांचा आलेला हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकऱ्यांनी आपलच डोक्याला स्वतःहून मारून घेतलं.सतत अस्मानी संकट येत असल्याने शेतकरी पुरता खचला आहे. गेल्यावेळाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अजुनही भरपाई मिळली नाही यामुळेही शेतकरी प्रचंड सरकारवर नाराज आहे.नासिक जिल्ह्यातील नांदगाव येथ गारपीट मुळे कांदा आणि द्राक्ष नुकसान झालं.

Tags:    

Similar News