सोयाबीनला कवडी मोल भाव
सोयाबीनला कवडी मोल भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट
ग्रामीण भागामध्ये यावर्षी पाऊस कमी प्रमाणात झाल्यामुळे मूग ,उडीद, मका हे पीकांचे नुकसान झाले आहे. सध्या जिल्हात शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड सुद्धा मोठ्या प्रमाणात केली आहे. गेल्या वर्षी सोयाबीनला सात हजार ते आठ हजार रुपये पर्यंत भाव होता यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पेरणी केली असून यावर्षीही भाव चांगला मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु आज बाजारपेठेमध्ये सोयाबीनला चार हजार दोनशे ते तीनशे रुपये असा कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या शेतामध्ये सोयाबीन काढून त्याची थापी मारत आहे अशी प्रतिक्रिया शेतकरी, व्यापारी यांनी दिली आहे. तर सरकारने सोयाबीनचा भाव वाढवून द्यावा अशी शेतकऱ्यांनी विनंती केली आहे.