सोयाबीन उत्पादक सापडला अडचणीत
सोयाबीन पिकावर येलो मोझॅक, खोडअळीचा प्रादुर्भाव; शेतकऱ्यांसमोर नापिकीचे संकट
यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आधीच जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे संकटात सापडले आहेत. सोयाबीनचे पीक हिरवेगार दिसत असले तरी शेंगा पोचट आहेत. सोयाबीन पिकावर येलो मोझॅक आणि खोडअळी या कीड रोगाने आक्रमण केले आहे. शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्च निघण्याची शक्यता नाही आहे. कुणीही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.