सोयाबीन पिकावर अळीचा प्रादुर्भाव
पावसाने दडी मारल्याने अक्षरश:आता आलेल्या पिकावर मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव झाला असून महागडी औषधे फवारणी करून देखील आळीवर नियंत्रण मिळत नसून केलेला उत्पादन खर्च वाया जातो की काय असा मोठा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे.;
जेमतेम पावसावर पिक पेरले मात्र येवला तालुक्यातील आलेल्या सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकऱ्यांपुढे आता नवं संकट उभे राहिले आहे. येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी अल्प पावसावर पेरण्या केल्या. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने अक्षरश:आता आलेल्या पिकावर मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव झाला असून महागडी औषधे फवारणी करून देखील आळीवर नियंत्रण मिळत नसून केलेला उत्पादन खर्च वाया जातो की काय असा मोठा प्रश्न शेतकऱ्याला पडला असल्याने आता शेतकरी हा हतबल झाल्याची भावना वैभव आणि ज्ञानेश्वर खिल्लारे यांनी व्यक्त केली आहे.