चोपडा तालुक्यात सोयाबीनची काढणी सुरू झाली असल्याने शेतकरी सोयाबीनची विक्री करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणताना दिसत आहेत. चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती दररोजची सोयाबीनची आवक साडेतीनशे ते चारशे क्विंटलची होत आहे. साडेचार हजार रुपये भाव माल पाहून मिळत आहे. येणाऱ्या काळामध्ये अजून सोयाबीनची आवक वाढण्याची शक्यता असल्याचे चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रोहिदास सोनवणे यांनी सांगितले.