IMD Report : हवामान खात्याकडून शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज

Weather News : स्कायमेटने जारी केलेल्या अंदाजानंतर राज्यातील शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले असतानाच आता भारतीय हवामान विभागाने मान्सूनचा अंदाज जारी करत शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज दिली आहे.;

Update: 2023-04-12 03:56 GMT

गेल्या दोन दिवसांपुर्वी स्कायमेट (Skymet) या हवामान या हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने मान्सूनचा अंदाज वर्तवताना शेतकऱ्यांची चिंता वाढणार असल्याचे म्हटले होते. त्यासाठी एल निनोचं कारण देण्यात आलं होतं. मात्र आता स्कायमेट पाठोपाठ भारतीय हवामान विभागानेही (IMD report) हवामान अंदाज जाहीर केला आहे. यामध्ये यंदा शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज देण्यात आली आहे.

राज्यात सध्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीने थैमान (Unseasonal Rain) घातल्याने शेतकरी उध्वस्त झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष खरीप हंगामात मान्सूनचा (Monsoon) अंदाज कसा असणार याकडे लागले होते. त्यातच आता भारतीय हवामान विभागाने मान्सूनचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. त्यामध्ये यंदा पाऊस सरासरीच्या 96 टक्के पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे यंदाही पावसाची स्थिती सर्वसाधारण राहणार आहे.

भारतीय हवामान विभागाकडून 1971 ते 2020 या कालावधीत मान्सूनची सरासरी 84 सेंटिमीटर इतकी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे सरासरीच्या 96 ते 104 टक्के पाऊस हा सर्वसाधारण मानला जातो. मात्र स्कायमेटने 94 टक्के इतकाच पाऊस पडणार असल्याचे सांगून शेतकऱ्यांचे टेन्शन वाढवले होते. यामध्ये 90 ते 94 टक्के शक्यता असल्यास थोड्या प्रमाणात आणि 90 टक्के पेक्षा कमी पाऊस असेल तर दुष्काळग्रस्त (Draught) स्थिती निर्माण होण्याची शक्यता असते.

गेल्या दोन दिवसांपुर्वी स्कायमेट या हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने सरासरीच्या 94 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता. मात्र त्यानंतर पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव रामचंद्रन (Ramchandran) आणि भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्यूंजर महापात्रा (Dr. Mrutunjay Mahapatra) यांनी यंदा मान्सून सरासरीच्या 96 टक्के होणार असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवत शेतकऱ्यांना गुड न्यूज दिली आहे. मात्र मान्सूनचा सुधारित अंदाज मे च्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल, असं सांगण्यात आलं आहे. (Good News For Farmer)

सर्वसाधारणपणे देशात २५ मे ते १ जून या दरम्यान पावसाची सुरुवात होत असते. कोकण किनारपट्टीलगत पाऊस हा जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पडतो. यावर्षी मात्र पाऊस लवकर येण्याची दाट शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने बांधला आहे. याआधी २०१९ मध्ये सरासरी ११० टक्के ,त्यानंतर २०२० मध्ये १०९ टक्के २०२१ मध्ये ९९ टक्के तसेच २०२२ मध्ये १०६ टक्के पावसाची सरासरी राहिली आहे. मात्र यंदा एल निनोचा प्रभाव असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Rain Update)

एल निनो काय आहे? (AL Nino)

एल निनो हा हवामानातील बदलाचा एक भाग आहे. या एल निनो प्रभावाचे हवामानावर परिणाम होत असतात. यामध्ये एल निनोच्या काळात पूर्व आणि मध्य विषुवृत्ताला पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागावर पाणी सामान्य तापमानापेक्षा गरम होते. त्यावेळी त्याचा परिणाम भारतातील मान्सूनवर होतो. यामध्ये प्रामुख्याने वाऱ्याची पध्दती बदलते. या एल निनोच्या प्रभावामुळे भारतात दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते. एल निनो प्रभाव साधारणपणे तीन ते सहा वर्षांनी तयार होतो. 

Tags:    

Similar News