शेतकऱ्यांचा मोदी सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम...

मागण्या मान्य करा अन्यथा मोठं आंदोलन करू;

Update: 2022-08-22 12:23 GMT

हमीभावाच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी आज संयुक्त किसान मोर्चाचं राजधानी दिल्लीच्या जंतरमंतरवर किसान महापंचायत पार पडली. या महापंचायतला शेतकरी नेत्यांची उपस्थिती फारशी पाहायला मिळाली नाही. शेतकरी नेते शिवकुमार कक्काजी यांच्यासह पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश येथील शेतकरी या आंदोलनात उपस्थित होते. यावेळी शेतकरी नेते शिवकुमार कक्काजी यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना आम्ही सरकारला आता 15 दिवसांचा कालावधी देत आहोत. जर 15 दिवसांच्या आत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही मोठं आंदोलन करु असा इशारा केंद्र सरकारला दिला आहे.

काय आहेत मागण्या...

देशातील सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जावं

शेतकरी आंदोलनादरम्यान दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत.

वीज विधेयक रद्द करावं.

केंद्र सरकारने आणलेली नवीन अग्नीपथ योजना मागे घ्यावी.

लखीमपूर खेरी हत्याकांडातील शेतकरी कुटुंबीयांना न्याय, तुरुंगात असलेल्या शेतकऱ्यांची सुटका आणि केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांना अटक

स्वामीनाथन आयोगाच्या C2+50 टक्के सूत्रानुसार एमएसपीची हमी देणारा कायदा

ऊसाच्या आधारभूत किंमतीत वाढ करून थकबाकी तातडीने द्यावी

जागतिक व्यापार संघटनेतून बाहेर पडावे आणि सर्व मुक्त व्यापार करार रद्द करावेत

प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत असलेली शेतकऱ्यांची थकबाकी तात्काळ द्यावी

राकेश टिकैत यांची अनुपस्थिती…

दिल्लीत शेतकरी आंदोलनाचा चेहरा बनलेल्या शेतकरी नेते राकेश टिकैत यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानं ते या आंदोलनात पोहोचू शकले नाही.

SKM Farmers give 15 days ultimatum to Modi Govt...

Tags:    

Similar News