लांबलेल्या मान्सूनचा खरिपाला मोठा फटका; अन्नधान्याचे उत्पादन घटणार?
उशिराने दाखल झालेल्या मान्सून (Monsoon2023) ने देशातील 14 शेतीप्रधान राज्यांना फटका बसला असून मुख्यत्वे भात,मका आणि तुर अशी खरिपाची मुख्य पिके पेरणी पासून वंचित राहिल्याने धान्य उत्पादनात यंदा मोठी घट अपेक्षित असल्याचं भारतीय हवामान विभागाने(IMD) म्हटलं आहे.;
उशिराने दाखल झालेल्या मान्सून (Monsoon2023) ने देशातील 14 शेतीप्रधान राज्यांना फटका बसला असून मुख्यत्वे भात,मका आणि तुर अशी खरिपाची मुख्य पिके पेरणी पासून वंचित राहिल्याने धान्य उत्पादनात यंदा मोठी घट अपेक्षित असल्याचं भारतीय हवामान विभागाने(IMD) म्हटलं आहे.
देशभर मान्सूनचे दमदार आगमन झाले असेल तर तब्बल तीन ते चार आठवडे मान्सून उशिरा दाखल झाल्याने प्रमुख खरीप पिकांचा पेरणीचा कालावधी निघून गेला आहे त्यामुळे शेतकरी प्रामुख्याने कमी कालावधीच्या पिकांकडे वळले आहेत.
ॲग्रीवॉच या कृषी विश्लेषण संस्थेचे संतोष झंवर म्हणाले, देशातील प्रमुख राज्यातील शेतकरी अजूनही पावसापासून वंचित आहेत उशिरा दाखल झालेल्या मान्सूनमुळे त्यांनी अजूनही पेरणीचा निर्णय घेतलेला नाही.
नैऋत्य मोसमी वारे देशात सर्वत्र पोहोचले आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम किनारपट्टीच्या भागात मोठा पाऊस पडला असला तरी राज्यातलं सरासरी पर्जन्य लक्षात घेता अजूनही 50% इतका जूनच्या सरासरी इतका पाऊसच पडला आहे. मराठवाड्यातील पावसाचं तुटवडा हा 68% असून विदर्भामध्ये तो 48% पर्यंत असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.
महाराष्ट्र हे देशातील अग्रगण्य कृषी उत्पादक राज्य असून राज्यात प्रामुख्याने तूर ऊस त्याचबरोबर देशाच्या उत्पादनात दुसऱ्या क्रमांकाचे कापूस आणि सोयाबीन उत्पादन होते.
अजूनही राज्यात सर्वदूर पुरेसा पाऊस नसल्याने राज्य सरकार आणि कृषी विभागाने शेतकऱ्यांना पुरेसा ओलावामुळे पर्यंत पेरणी करू नये असं आवाहन केलं आहे त्यामुळे कदाचित पुढील दुबार पेरणीचे संकट टळू शकेल असा शासनाचा अंदाज आहे.
महाराष्ट्रात सोबतच प्रमुख शेती उत्पादक राज्य असलेल्या बिहार आणि झारखंड बरोबरच पूर्वेकडील अनेक राज्यांमध्ये 69 ते 47 टक्के इतका पावसाचा तुटवडा आहे.
तेलंगणा या प्रमुख खरीप उत्पादक राज्यांमध्ये दक्षिणेकडील भाग हा जवळपास 49 टक्के इतका कमी पर्जन्य झाला आहे.
बिहार राज्यांमध्ये पर्जन्याचे प्रमाण सरासरीपेक्षा 30% कमी असून नुकतीच बिहार राज्य सरकारने एक महत्त्वाची बैठक घेतली त्यामध्ये खरिपाचा आढावा घेण्यात आला त्याच बरोबर परिस्थिती अशीच राहिल्यास दुष्काळी उपाय योजना राबवण्याबाबतही या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचे समजते.
भात हे बिहारचे मुख्य खरीप पिक असून भाताबरोबरच मक्याचे ही मोठ्या प्रमाणात उत्पादन होते.
तेलंगणा सरकारने खरीपाचा आढावा घेत शेतकऱ्यांना कमी कालावधीची भाताची वाण लागवडीसाठी सल्ला दिला आहे. त्यामुळे जरी कमी पाऊस झाला तरी पीक हाताला लागेल असा सरकारचा होरा आहे.
अशा बिकट परिस्थितीमध्ये प्रामुख्याने शेतकरी खरिपाचे मुख्य पीक टाळून कमी कालावधीची पिके लागवडीकडे भर देतात. देशातील मध्य प्रदेश आणि छत्तीसगड भागामध्ये गेल्या दोन-तीन दिवसात भरपूर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे.एकंदरीतच कमी पर्जन्य आणि पेरणी घटल्यामुळे मोठ्या प्रमाणात यंदा खरीप उत्पादन घटेल .असा कृषी विश्लेषकांचा अंदाज आहे.
हे ही पहा