बारावी पास महिलेनं गावात उभारली भाज्यांची पावडर तयार करण्याची कंपनी...

छोट्याश्या गावात फक्त 12 वी शिकलेल्या महिलेलने गावात भाज्यांची पावडर तयार करणारी कंपनी उभारलीय.. कंपनीच्या माध्यमातून महिलेने शेतमालाला भाव मिळत नसल्याने आर्थिक संकटात असलेल्या भाजीपाला उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना तर तारलंयच . शिवाय गावातीलच दहा ते पंधरा महिलांना रोजगार उपलब्ध करुन देत स्वत:च्या पायावर उभं केलंय. जळगावातील वंदना प्रभाकर पाटील या महिलेने ही कमाल केलीय, पहा प्रतिनिधी संतोष सोनवणे यांचा रिपोर्ट...

Update: 2023-05-10 08:13 GMT

जळगाव जिल्ह्यातील पळासखेडे या छोट्याश्या गावात फक्त 12 वी शिकलेल्या महिलेलने गावात भाज्यांची पावडर तयार करणारी कंपनी उभारलीय.. कंपनीच्या माध्यमातून महिलेने शेतमालाला भाव मिळत नसल्याने आर्थिक संकटात असलेल्या भाजीपाला उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना तर तारलंयच . शिवाय गावातीलच दहा ते पंधरा महिलांना रोजगार  उपलब्ध करुन देत स्वत:च्या पायावर उभं केलंय. जळगावातील वंदना प्रभाकर पाटील या महिलेने ही कमाल केलीय, पहा प्रतिनिधी संतोष सोनवणे यांचा रिपोर्ट

Full View

पळासखेडे या गावातील वंदना पाटील यांच्या कडे पाच एकर शेती आहे.  शिक्षण म्हटलं तर केवळ बारावी पास. सुरवातीला बचत गटाद्वारे पापड उद्योग सुरु केला.तसंच शेतीमध्ये त्या भाजी पाल्याच उत्पन्न income घेत असतात, मात्र ज्या वेळी भाजीपाला येतो (vegetable product's) त्यावेळी बाजारात भाज्यांचे दर घसरल्याने अपेक्षित फायदा होत नसल्यानं त्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत असे, यावर उपाय म्हणून भाज्या निर्जलीकरण dehydration करून त्याचं मुल्यवर्धन करता येणे शक्य आहे. त्या आधारावर काही प्रकल्प (project )सुरु करता येतो, का याबाबत वंदना पाटील यांनी कृषी विभागाकडून (agriculture department) माहिती घेतली. त्याबाबतचे कृषी विभागाचे प्रशिक्षण ( training) सुध्दा वंदना पाटील यांनी पूर्ण केलं. वंदना पाटील यांनी हिंमतीने आणि आत्मविश्वासाच्या जोरावर पळासखेडा या छोट्याशा खेड्यात गेल्या सहा महिन्यांपूर्वी  भाज्या निर्जलीकरण (dehydration) करुन भाज्यांची पावडर तयार करण्याची कंपनी उभारली. आपल्या गावातील काही महिलांना घेऊन गायत्री फुड नावाने हा उद्योग सुरू केला आहे. शासनाच्या प्रधान मंत्री सूक्ष्म खाद्य अन्न योजनेच्या माध्यमातून पावणे सहा लाख रुपयांचे कर्ज घेऊन हा प्रकल्प सुरू केला.या प्रकल्पाला त्यांना पावणे दोन लाख रुपयांचे अनुदान grant मिळणार असल्याने उभारणी खर्च कमी होण्यास मदत झाली आहे.  या उद्योगात मागणी नुसार त्या भाज्या कोरड्या करून त्याची पावडर तयार केल्यानंतर मार्केट मध्ये त्याची विक्री करत असतात. यामधे प्रामुख्याने कांदा, टमाटर, बिट, शेवगा, पालक, मेथी, पालक, कोथंबिर, कढी पत्ता, आद्रक, केळीच्या कंबळ इत्यादी भाज्यांच्या समावेश आहे.

भाजीपाल्याची पावडर करण्याची पध्दत आहे -

भाजीपाला धुवून स्वच्छ केला, जातो, त्यानंतर कटींग मशीनच्या माध्यमातून ते सुकविले जाते, आणि त्यानंतर त्याची पावडर तयार होते, सौर ऊर्जेच्या माध्यमातून या भाज्या नैसर्गिक naturaly पद्धतीने सुकविल्या जात असल्याने त्याचा रंग आणि गुणवत्ता best quality कायम राहत असल्याचं ही वंदना पाटील सांगतात. पूर्णता नैसिर्गिक असल्याने कॅन्सर, किडनीचे आजार, ॲसिडीटी, मधुमेह, त्वजा, केस,  अशा एक अनेक आजारांवर भाज्यांची पावडर गुणकारी असल्याने दिवसागणिक त्यांच्या उत्पादनांना जळगावबरोबरच  पुणे, नाशिक, मुंबई, अहमदनगर यासह राज्यभरातून विविध जिल्ह्यांमधून मागणी वाढत (demand) असून दर महिना सरासरी दोन लाख रुपयांची त्यांची उलाढाल होत आहे. सर्व खर्च वजा जाता त्यांना जवळपास पन्नास हजार रुपयांचा नफा मिळत असल्याने भाज्या निर्जलीकरण प्रकल्प त्यांना चांगलाच फायदेशीर ठरू लागला आहे. गेल्या सहा महिन्यात या कंपनीने लाखोंची उलाढाल केली असून अल्पावधीतच अनोखी ओळख निर्माण केली आहे. आता कंपनीत नवनवीन प्रयोग सुध्दा केले जात आहे.

Tags:    

Similar News