ज्वारी-बाजरी वधारली

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमधील ज्वारी- बाजरीचे दर वाढले

Update: 2023-10-10 13:30 GMT

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमधील ज्वारीला 6,500 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. तर बाजरीलाही 3,000 रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल दराने विकली जात आहे. किरकोळ बाजारात बाजरी आणि ज्वारीच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे ज्वारी, बाजरीच्या दरात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांची भाकरी आता महागली आहे. सध्या बाजारामध्ये बाजरीची आवक कमी असल्यामुळे दरात वाढ झाली आहे. नवीन माल येण्यास सुरुवात झाल्यानंतर बाजरीच्या आणि ज्वारीच्या दरात घसरण होईल, असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

बारामतीत तालुका प्रमुख पीक म्हणून बाजरीचे पीक घेतले जाते. मात्र यावर्षी जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांमध्ये पाऊस अत्यंत कमी प्रमाणात पडल्यामुळे बाजरी पिकाची पेरणी जवळपास सरासरी क्षेत्र १,७०० हेक्टर आहे. केवळ २५ टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. ज्वारीची पेरणी ३,७००हेक्टर क्षेत्रात ज्वारीची पेरणीच्या बियाण्याचे वाटप केले आहे. ज्वारीचे पीक प्रामुख्याने या भागामध्ये सुपे, मोरगाव, उंडवडी, सुपे जळगाव, लोणी भापकर, या जिरायती भागामध्ये ज्वारीचे पीक घेतले जाते त्यामुळे या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अन्नधान्य पिकाचे लागवड करावी यासाठी कृषी विभागाकडून प्रवृत्त करत आहोत. बारामती तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल बारामती यांनी माहिती दिली आहे.

आज एकीकडे आरोग्याबद्दल जागरूकता वाढल्यामुळे ज्वारीची भाकरी उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात खाल्ली जाते त्यामुळे शरीरामधील पित्त शामक ज्वारीचा उपयोग केला जातो ज्वारी मध्ये जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असतात त्याचप्रमाणे फायबर असतात त्यामुळे ज्वारीची भाकरी कधीही खाणं चांगलंच तसेच बाजरीची भाकरी हिवाळ्यामध्ये खाल्ल्याने शरीरामध्ये उत्साह वाढतो ज्वारी आणि बाजरीच्या भाकरी मध्ये विटामिन्स जास्त प्रमाणात असतात त्यामुळे ज्वारी आणि बाजरी रोजच्या आहारामध्ये खालल्याने शरीराला आरोग्यदायक आहे शरीराला हितकारक आहे. बारामती तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती बारामती मनोज खोमणे यांनी सांगितले आहे..

परंतु खरिपात वातावरण पोषक नसणे, चवीला चांगले नसणे, कडबा कसदार नसणे आणि रोगराई या कारणांमुळे खरीप ज्वारीला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. पुणे जिल्ह्यातल्या ता.बारामती गावातील हा परिसर ज्वारीसाठी प्रसिद्ध सुपा परगांना, माळवाडी, मोरगाव, लोणीभाकर, ज्वारीच्या काढणीसाठी परिसरातून मजुरांची कुटुंबं स्थलांतरित व्हायची. अडीच-तीन महिने ज्वारीची काढणी मळणी करून मुजरांकडून घ्यायची. मालदांडी, गावरान, ज्वारीचे वाण प्रसिध्द आहेत. मालदांडी ज्वारीची भाकरी खमंग आणि चवदार असल्याने शहरातून मागणी जास्त आहे. शेतकरी रब्बी तसेच उन्हाळी ज्वारी आणि बाजरी पिके घेत असत, त्यामुळे शेतकऱ्यांना अन्नधान्य तसेच गुरांसाठी चारा उपलब्ध होते. शेतकरी उन्हाळी ज्वारी, बाजरीचे क्षेत्र घटल्याने उत्पादनात घट होत आहे. त्यामुळे दोन्ही धान्यांचे भाव वाढत आहेत.

Full View

Tags:    

Similar News