Monsoon2023 आता परतीच्या पावसाकडून अपेक्षा
ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस MJO ऍक्टिव्ह होऊन पश्चिम बंगालच्या महासागरात कमी दाबाचा पट्टा तयार होईल, सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात राज्याच्या पर्जन्यछायेच्या प्रदेशात पाऊस पडेल असा अंदाज हवामान विश्लेषक विजय जायभाये यांनी व्यक्त केला आहे.;
ते म्हणतात,"18/19/20/21 ऑगस्टला निर्माण होणारा कमी दाबाचा पट्टा मध्य भारतातील छ्तीसगड मध्य प्रदेश तेलगना आणि उत्तर भारतात पाऊस देणार याचा परिणाम महाराष्ट्राच्या विदर्भ आणि पूर्व मराठवाडा या भागात जास्त म्हणजे सरासरी इतका होईल मात्र मध्य महाराष्ट्र कडे किरकोळ मध्यम पाऊस होईल."
"MJO ऑगस्ट च्या शेवटी पुन्हा एक्टिव्ह फेज मध्ये येण्याची शक्यता असून 20 ऑगस्ट पासून कमी दाबाचे पट्टे बंगालच्या उपसागरावर निर्माण होत जातील आणि मध्य भारतात काही भागात पाऊसाठी पोषक वातावरण निर्माण होईल. तसेच ऑगस्ट मध्ये एल निनो तीव्र झालेला असून याचा परिणाम प्रमाणात जाणवत आहे असे त्यांनी सांगितले.
"हिंदी महासागरावर iod देखिल पॉजिटीव्ह फेजकडे कलत असल्यामुळे तसेच परतीच्या काळात म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये MJO देखिल एक्टिव्ह फेज मध्ये आल्यास अरबी समुद्रात व बंगलाच्या उपसागरावर आणि अरबी समुद्रात तीव्र कमी दाब बनून मध्य महाराष्ट्रतील पर्जन्यछायेच्या प्रदेशात देखील पाऊस वाढेल असा हवामानाचा अंदाज आहे.
" el nino चे वर्ष असल्यामुळे मान्सूनचा काळ संपल्यानंतर देखील ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये खराब वातावरण आणि काही भागात पाऊस होण्याची दाट शक्यता आहे."
⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️
5
उत्तर महाराष्ट्र 17 ऑगस्ट
कोकण सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी ठाणे मुंबई पालघर काही भागात अधून मधून जोरदार पाऊस होईल."
"जळगाव धुळे नंदुरबार काही भागात 19/20/21 मध्यम ते जोरदार पाऊस होईल नाशिक अहमदनगर संभाजी नगर किरकोळ भागात 19/20 ऑगस्ट मध्यम पाऊस होईल
⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️
कोकण सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी ठाणे मुंबई पालघर काही भागात अधून मधून जोरदार पाऊस होईल."
⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️
6
मध्य महाराष्ट्र 17 ऑगस्ट
"19/20 ऑगस्ट पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर सांगली मध्यम पाऊस पडेल. तसेच पुढील काही किरकोळ ठिकाणी जोरदार पाऊस होईल.
⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️
7
मराठवाडा 17 ऑगस्ट
"पुढील चार दिवसात 19/20/21ऑगस्ट पुढील दोन दिवस पूर्व मराठवाड्यात लातूर नांदेड हिंगोली परभणी जालना बीड धराशिव काही भागात मध्यम ते जोरदार पाऊस तर काही भागात हलका मध्यम पाऊस होईल."
⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️
8
विदर्भ 17 ऑगस्ट
"विदर्भात पाऊस वाढणार पूर्व विदर्भ नागपूर गोंदिया वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली अमरावती अकोला18/19/20ऑगस्ट जोरदार पाऊस होईल बुलढाना वाशीम सह विदर्भात पावसात पाऊस राहील मध्यम ते काही भागात जोरदार होईल."