उरलं सुरलं पीक वाया जाण्याचा धोका..
जेमतेम पावसावर खरिपाच्या ( Kharip 2023) पेरण्या केल्या मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने अक्षरशः खरीप पिक वाळून जात आहे. परिणामी नाशिक ( Nasik) जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील शेतकरी चिंतेत आहे.
नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम हा वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
सिन्नर तालुक्यात देखील अशीच परिस्थिती असून जेमतेम पावसावर शेतकऱ्यांनी खरीपच्या पेरण्या केल्या त्यांचे पीक उगवलं तर काही ठिकाणी उगलेच नाही. देशी जुगाडाच्या साहाय्याने उगवलेल्या पिकामध्ये कोळपणी करताना सध्या शेतकरी दिसत असून जर पाऊस पडला नाही तर पेरलेलं पीक देखील वाया जाणार असल्याच्या भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.
तर मोठ्या पावसाची चातकासारखी वाट देखील बळीराजा बघत आहे, असे शेतकरी
सुलोचना पवार आणि वसंत पवार यांनी सांगितले.