मागील वर्षांपासून एक रुपयात पीक विमा ही योजना सुरु झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. त्यासाठी गेल्या वर्षीच 31 जुलै पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना मुदत दिली होती. ह्या वर्षीही मुदत वाढ मिळावी अशी मागणी होती केंद्र सरकारनेही ही मागणी मान्य केली आहे. आता शेतकरी 31 जुलै पर्यंत पीक विमा भरू शकतात यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्य सरकारने एन निडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री 'माझी लाडकी बहीण' महत्वाकांशी
योजनेमुळे राज्यातील सर्वच सामूहिक सुविधा केंद्रांवर( CMC) मोठा ताण आला आहे. तसेच मागील वर्षीप्रमाणे काही शेतकऱ्यांना ३१ जुलैपर्यंत पीकविमा भरता येतो असा समज झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी विमा भरण्यापासून वंचित राहिले यामुळे राज्य सरकारने विमा भरण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी कृषिमंत्री धनंजय मुंडे तसंच कृषी विभागाचे मुख्य सचिव व्ही. राधा यांनीही केंद्रीय कृषी सचिवांना पत्राद्वारे विनंती केली होती केंद्र सरकारनेही शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन पीकविमा ची मुदत वाढवून 31 जुलै पर्यंत केली आहे.
गेल्या वर्षा पासून राज्यात एक रुपयांत पीकविमा योजना राबविल्याने त्याला मोठा प्रतिसाद मिळाला . मागील वर्षी 1कोटी 70 लाख शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता. त्यामुळे यंदाही तसाच प्रतिसाद मिळेल मात्र त्यात मोठी घट झाली आतापर्यन्त
1 कोटी 10 लाखांच्या आसपास शेतकऱ्यांनी पीकविमा भरला आहे. यंदाच्या खरीप हंगामातील पेरणी क्षेत्र 144 लाख हेक्टर आहे. त्यापैकी विमा उतरवलेले क्षेत्र 72 लाख हेक्टर आहे. हे क्षेत्र पेरणीक्षेत्राच्या 50 टक्के इतकंच आहे. गेल्यावर्षी पीक विम्यासाठी हे क्षेत्र पेरणी क्षेत्राच्या 80 ते 82 टक्के इतके होते. मागील वर्षीही पीकविम्यास ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली होती.