तुती लागवडीने गाव बदलले

बारामती तालुक्यातील साबळेवाडी परिसरातील तब्बल १५० एकर क्षेत्रात तुतीची लागवड;

Update: 2023-09-14 12:30 GMT

पुणे जिल्ह्यात साबळेवाडी गावाची ओळख रेशीम उद्योगामुळे रेशीमवाडी म्हणून झाली आहे. बारामती तालुक्यात सुमारे सोळाशे लोकसंख्येचे साबळेवाडी गाव आहे. सन २००५ च्या आसपास गावातील मोजके शेतकरी रेशीम व्यवसायाकडे वळले.कोषांना मिळणारा चांगला दर आणि पिकांच्या तुलनेत मिळणारे उत्पन्न पाहून गावातील अन्य शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळाली. आज तालुक्यातील २५० एकर क्षेत्र वर तूतीची लागवड आहे. त्यापैकी साबळेवाडी परिसरातील क्षेत्र १५० एकरांपर्यंत आहे. कृषी विभाग,रेशीम कार्यालय यांच्या सहकार्यातून शेतकरी गट बांधणी,अनुदानांद्वारे रेशीम उद्योगवाढीस प्रोत्साहन मिळाले आहे.विक्री व्यवस्था तयार झाली आहे. कोरडवाहू पट्ट्यात शेतकऱ्यांना रेशीम शेतीचा हुकमी पर्याय गवसला आहे.रेशीम शेड उभारणीसाठी शेतकऱ्यांनी दोन ते पाच लाख रुपयांपर्यत गुंतवणूक केली आहे. कर्नाटक,गडहिंग्लज येथून अंडीपुंज आणले जातात.चॉकी सेंटरमधूनही बाल्यावस्थेतील अळ्या उपलब्ध होतात. बारमाही पाणी असल्यास शंभर ते दोनशे अंडीपुजांची एक अशा वर्षात चार ते पाचपर्यंत बॅचेस घेण्यात येतात. अळ्यांच्या वाढीच्या प्रत्येक अवस्थेत पुरेशी जागा ठेवली जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.तुती लागवडीमुळे आमच्या कुटुंबाची आर्थिक उलाढाल झाली असून आमच्या कुटुंबातील मुले चांगले शिक्षण घेत आहेत त्यामुळे इतर शेतकऱ्यांनी देखील या व्यवसायाकडे वळले पाहिजे असे महिला शेतकऱ्यांनी सांगितले..

Full View

Tags:    

Similar News