हा आठवडा पावसाचा
पुढील एक आठवडा राज्यात बंगाल च्या उपसागरावर wml एका पाठोपाठ एक तीव्र कमी दाबाचे पट्टे तयार होऊन येत आहे.त्या परिणाम मुळे राज्यात 18 जुलै पासून पुर्व विदर्भ ब्लु कलर दर्शवला आहे त्या भागात अति जोरदार पाऊस होणार आहे.
पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने पेरण्या ठप्प झाल्या असून विभागात खरीपाचे सर्वसाधारण क्षेत्र ४८ लाख ५७ हजार हेक्टर आहे. त्यापैकी २९ लाख चार हजार हेक्टरवर पेरणी झाली.
संपूर्ण आठवडा पावसाचा
"पुढील एक आठवडा राज्यात बंगाल च्या उपसागरावर wml एका पाठोपाठ एक तीव्र कमी दाबाचे पट्टे तयार होऊन येत आहे त्या परिणाम मुळे राज्यात 18 जुलै पासून पुर्व विदर्भ ब्लु कलर दर्शवला आहे त्या भागात अति जोरदार पाऊस होईल".
"कोकण उत्तर कोकण आणि जळगाव, नंदुरबार, नाशिक पश्चिम भाग, पुणे, पश्चिम सातारा,कोल्हापूर, सिंधुदुर्ग,रायगड, रत्नागिरी, मुंबई, ठाणे, पालघर मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पुढील एक दीड आठवडा सक्रिय राहील. रेड भागात दर्शवलेले जिल्हे नाशिक, संभाजीनगर, अहमदनगर उत्तर भाग, धुळे, जळगाव, जालना,बीड, परभणी, हिंगोली, नांदेड या परिसरात मध्यम ते मुसळधार पाऊस 18/19 ते24/25 जुलै या काळात होईल दक्षिण महाराष्ट्र मध्यम पाऊस होईल."
मराठवाड्यात पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने २० लाख हेक्टरवर पेरणी होऊ शकली नाही. जुलैच्या मध्यातही पावसाने दडी मारल्याने कडधान्यांची पेरणी बाद झाली आहे. कापूस, मका, तूर, सोयाबीन पिकांनाही उशीर झाला असल्याने कमी कालावधीचे वाण निवडण्याची सूचना कृषी विभागाने केली आहे. सद्यस्थितीत खरीप हंगाम पूर्णत: संकटात सापडला आहे.
विजय जायभावे हवामान अंदाज दि 17 जुलै 2023
रविवार दि. १६ जुलै २०२३
1
' पुढील 11 दिवस जोरदार पावसाचे '
"आजपासुन पुढील ११ दिवस म्हणजे गुरुवार दि.२७ जुलै पर्यन्त संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे.मुंबईसह कोकण व विदर्भातील (७+११)१८ जिल्ह्यात मात्र अति-जोरदार पावसाची शक्यता आहे."
2
"मध्य महाराष्ट्रातील खान्देश, नासिक ते सोलापूर पर्यंतच्या १० तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर ते नांदेड पर्यंतच्या ८ अश्या १८ जिल्ह्यात पुढील १२ दिवस म्हणजे गुरुवार दि.२७ जुलै पर्यन्त मुसळधार पावसाची शक्यता आहे."
3
" मध्य महाराष्ट्रातील १० जिल्ह्यात मंगळवार दि.१८ ते गुरुवार दि.२० जुलै अश्या ३ दिवसात अधिक जोरदार पावसाची शक्यता आहे."
4
"मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात मात्र मुसळधार पडणारा पाऊस ६ दिवसानंतर म्हणजे शनिवार दि.२२ जुलै पासून काहीसा कमी होवुन तेथे मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता जाणवते"
5
धरण साठा वाढणार
महाराष्ट्रातील धरण-पाणीसाठा आजपावेतो केवळ सरासरी २५% पर्यन्त पोहोचला असून येत्या १५ दिवसात पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील तसेच विदर्भातील सर्व धरण क्षेत्रात जोरदार पावसाच्या शक्यतेमुळे धरण-पाणीसाठा सरासरी ७०% पर्यन्त पोहोचण्याची शक्यता आहे."
6
"मान्सूनचा आस सरासरी जागेपासून दक्षिणेकडे सरकण्याच्या शक्यतेबरोबरच (ii) बं.उ.सागरातील 'चक्रीय-वारा अभिसरण' प्रणालीतून उत्तर ओरिसा,बंगाल व झारखंड राज्याच्या भुभागावर आज दि.१६ जुलैला तयार झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे सहा किमी उंचीपर्यन्तचे चक्रीय वारे व त्यांचे वायव्य दिशेने मध्य भारताकडे होणाऱ्या मार्गक्रमण शक्यतेमुळे तसेच (iii) लगेच बं. उ. सागरात त्या पाठोपाठ त्याच ठिकाणी परवा मंगळवार दि.१८ जुलैला नवीन 'चक्रीय-वारा अभिसरण' प्रणालीची निर्मिती व तिचे पुन्हा वायव्य दिशेने मध्य भारताकडे होणाऱ्या मार्गक्रमण शक्यतेमुळे महाराष्ट्रात १०-१२ दिवस कमी-अधिक पावसाची शक्यता निर्माण झाली आहे"
7
" ह्या पावसावरच (i)खरीपातील शेवटच्या टप्प्यातील पेरण्यास तसेच (ii) कमी ओलीवरील झालेल्या पेर पिकांना जीवदान व (iii) बारगळलेल्या पेरण्यांच्या दुबार पेरणीस मदत होईल".
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd.)
IMD Pune.